विद्यार्थी सहाय्यता मंडळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडले – प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे

*
नांदेड :(दि.२९ जानेवारी २०२५)-
यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थी सहायता मंडळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल केल्याचे मत माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी व्यक्त केले.
यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थी सहायता मंडळामार्फत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांची उपस्थिती होती तर विद्यार्थी सहाय्य मंडळाचे समन्वयक डॉ. अजय टेंगसे, सदस्य डॉ. पी. आर. मुठ्ठे, डॉ. एस. आर. जैस्वाल, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, कु. भारती सुवर्णकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी सहाय्य मंडळाचा लाभ घेऊन त्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या शैक्षणिक साहित्याचा आपल्या शैक्षणिक विकासासाठी लाभ घेऊन यशस्वी व्हावे; असे सांगतानाच अनेक विद्यार्थी विद्यार्थी सहाय्य मंडळामुळे उज्वल भविष्य उभारू शकले, याचा मला आनंद वाटतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. अजय टेंगसे यांनी, विद्यार्थी सहाय्य मंडळाच्या माध्यमातून होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करता आल्याचे समाधान वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ६० विद्यार्थ्यांना परीक्षा फीस सवलतीसह विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भारती सुवर्णकार यांनी केले तर आभार डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, लेखापाल अभय थेटे, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.