ताज्या घडामोडी

नायब तहसिलदार एस.एस. खिल्लारे* यांचा *माझा समाज* या उपक्रमार्तंगत वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जिवन चरित्र्यावरील पूस्तक भेट देऊन सत्कार.

*Corespondent / Anil chavan.*
*mcr.news / manawat*
——————————————

आज दिनांक 2 जानेवारी रोजी मानवत तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार श्री खिल्लारे साहेब यांनी येथील महाकवी चंदवरदाई सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्रास भेट दिली. यावेळी नायब तहसिलदार खिल्लारे यांचा शाल, श्रीफळ व विरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जीवनावरील पुस्तक भेट देऊन *’माझा समाज’* या उपक्रमाच्या वतीने संस्थेचे संचालक गोपाळराव लाड यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी नायब तहसिलदार श्री खिल्लारे साहेब म्हणाले की मी एम.पी.एस.सी. परिक्षेच्या माध्यमातून नायब तहसीलदार या पदापर्यंत पोहोचलो आहे.
आपण आपल्या वाचनालयाचा अभिनव उपक्रम मला खूप आवडला आहे. आपण वर्ग ८ वी, ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रात्री 7 ते 9 या वेळे मध्ये मी देखील आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळ देऊ शकतो. मला देखील या सर्व गोष्टीची आवड , व छंद आहे आणि आपण माझी आवड तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मला खरोखरच मनस्वी आनंद झाला आहे. तरी आपण म्हणालं तेव्हां मी आपणास किंवा आपल्या विद्यार्थ्यांना वेळ देण्यास नक्कीच येईल. मला पण ते आवडेल असा शब्द त्यांनी यावेळी सत्कार प्रसंगी दिला.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.