भगवान सत्यसाईबाबांची माता ईश्वरम्मा यांची पुण्यतिथी ‘ईश्वरम्मा दिवस’ म्हणून जिल्हा सत्य साई संघटनेकडून सलग पाच दिवस विविध समाजोपयोगी उपक्रम घेऊन साजरी करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी म्हणजे २ तारीख रोज मंगळवारला संघटनेकडून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन सत्य साई केंद्र,सर्वोदय वार्ड गडचिरोली येथे सकाळी ९ ते १२ पर्यंत करण्यात आलेले आहे. दिनांक ३ मे ला संध्याकाळी सेमाना देवस्थान परिसर स्वच्छता,४ मे ला संध्याकाळी ५.०० वा.लक्ष्यार्चन,५ मे ला संध्याकाळी पाल्यांकडून मातृपितृंचे चरण पुजन,ईश्वरम्मा पुण्यतिथी दिनी म्हणजे ६ मे ला दु.११ते ३.०० वा. बालविकास विद्यार्थी व भक्त यांचे स्नेहसंमेलन, असे विविध कार्यक्रम साई संघटनेकडून ‘साई सत्संग हॉल’ येथे घेण्यात येणार आहेत.
‘रक्तदान श्रेष्ठ दान’ असल्याने रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्त दात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक दायित्व पार पाडावे. असे आवाहन साई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले आहे.अधिक माहिती साठी-९४२३६४६७४३ या मो.क्रमांकावर संपर्क साधावा.