ताज्या घडामोडी

जगात जर्मणी, भारतात परभणी असे स्लोगन असलेल्या प्रभावती नगरिकडे राज्यकर्त्यांचे दूर्लक्ष :अतिश नाना गरड.

मानवत / प्रतिनिधी.

देशातील केंद्र आणि राज्यातील महाराष्ट्र लोक कल्याणकारी राज्य सरकार कडुन परभणी सह परभणीकरांवर जाणिवपुर्वक सपत्नीक वागणूक मिळत असल्यामूळे परभणीच्या स्थानिक लोक प्रतिनिधींचा पडत नाहीय कुठेच प्रभाव जिल्हाचे पालकमंत्र्यांचे परभणीकरांवर पूर्णपणे दुर्लक्ष तर मुबलक पाणी असुनही शहरात पाणीटंचाईचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. शहरात एम. आय. डी, सी. असून ही औद्योगिक विकासाचा अभाव तर खराब रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा तर शहरातील अपूर्ण रस्ते आणि उड्डाणपुलांची खोळंबलेली कामे शहरासह जिल्हात वाढती गुन्हेगारी आणि असुरक्षितता जिल्हातील नागरिकांना अपुऱ्या सार्वजनिक नागरी सुविधा, नागरिकांना अनियमित वीज पुरवठा , दूषित वातावरणामूळे प्रदूषणाची वाढती पातळी, शिक्षण आणि आरोग्य सुविधा अपुरी, अवैध्य मावा, मटका आणि मिरवणूकींचा अतिरेक शहरासह जिल्हात सुशिक्षित बेकारांचे प्रमाण जास्त, शहरासह जिल्हातील लहान, लहान लघू उद्योगांचे बंद पडणे याचे प्रमाण वाढत असल्यामूळे उद्योगावर गंडांतर आले आहेत. *तर मी एक परभणीकर*
या नात्याने जास्तीत जास्त परभणीकरांना जागे करून जनआंदोलन उभे करण्यासाठी आजच सज्ज होऊन सहभागी व्हाव लागेल नाही तर आपल्या येथील युवकांना पुण्या मुंबई जे भाऊ व नाते वाईक पोटा पाण्यासाठी आपल्या पण भटकंती करावी लागेल यासाठी युवा शक्तीने माझी परभणी माझा विकास या सारखे उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. राजकारण्यानी जरी पाठ फिरविली असली तरी युवाशक्तिने जागृक राहणे गरजेचे असल्याचे मत मराठा समन्वयक अतिश नाना गरड पाटील यांनी व्यक्त केले आहे.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.