ताज्या घडामोडी

आपल्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

मानवत / प्रतिनिधी.

आज दिनांक ०४ ऑक्टोंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरण यांच्या कार्यालया बाहेर तीन तास केले ठिय्या आंदोलन. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतीला दिवसा विज देण्यासाठी सोलार योजना काढली होती.
या मध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाग घेत ऑनलाइन अर्ज केले होते.पैसे भरल्या नंतर सर्वे झाले. सर्वे होऊन सहा-सात महिने झाले तरी शेतकऱ्यांना मात्र कंपन्यांनी सोलार पंप बसऊन दिले नाही. जिल्ह्यात कुठेच कंपन्यांचे ऑफिस किंवा सर्विस सेंटर नाहीत. शेतकऱ्यांनी तक्रार करायची तरी कुठे. महावितरणचे अधिकारी फोन उचलत नाहीत. वसमत रोड येथे असलेले मेढा च्या कार्यालयात उडवा उडवी चे उत्तर येथील कर्मचारी देतात. शेतकऱ्यानं करायचे तरी काय….? यातले काही शेतकरी स्वाभिमानीच्या कार्यालयात आपली तक्रार घेऊ आल्या नंतर आज स्वाभिमानीचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. चर्चा दरम्यान असे लक्ष्यात आले की जिल्ह्यात काम करणाऱ्या कंपन्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही. सोलार कंपन्या मन मानी पद्धतीने काम करत आहेत. यावर मा.अधीक्षक अभियंता यांनी व महाऊर्जा विभागाचे अधिकारी यांनी असे सांगितले की १०/१०/२४ ला सर्व कंपन्या आमचे अधिकारी व स्वाभिमानीचे पदाधिकारी तथा शेतकरी यांच्यात बैठकलाऊन हा प्रश्न मार्गीलाऊ असे लिखित पत्र दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळेस किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, माऊली शिंदे, अभिराज चापके, मयूर वाघमारे, राम गोळेगावकर, किशन शिंदे, दत्ता परांडे यांच्यासह अनेक शेतकरी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.