ताज्या घडामोडी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ‘स्वच्छता ही सेवा’ रॅली सह विविध उपक्रम संपन्न

नांदेड: प्रतिनिधी
आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमांतर्गत विद्यापीठात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून राष्ट्रीय सेवा योजना व उच्च तंत्र शिक्षण विभाग यांच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आज विद्यापीठाच्या गेट समोरील परिसराची स्वच्छता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या उपस्थितीत कर्मचारी व विद्यार्थी यांनी केली. त्यानंतर विद्यापीठ गेट पासून स्वच्छता रॅली स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स संकुल येथे काढण्यात आली. स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स येथे डॉ. मनोहर चासकर यांच्या उपस्थितीत श्रमदान करण्यात आले. याप्रसंगी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. सूर्यकुमार जाधव, उपकुल सचिव रामदास पेदेवाड ,जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, उपकुलसचिव डॉ. सरिता यन्नावार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.सुहास पाठक गणित संकुल संचालक डॉ. ज्ञानेश्वर पवार ,डॉ. नितीन दरकुंडे डॉ. उषा सांगळे डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. रूपाली जैन आदी मान्यवरांची उपस्थिती होती

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.