ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त श्री.दत्ता तुमवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन

नांदेड:( दि.४ ऑक्टोबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त दि. ५ ऑक्टोबर २०२४, शनिवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता मानव्यविज्ञान विद्या शाखा आयसीटी हॉल क्र.१४ येथे सुप्रसिद्ध लेखक व वक्ते श्री. दत्ता तुमवाड यांचे ‘गांधी विचार: कल्पना, वास्तव आणि भवितव्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी विद्यार्थ्यांद्वारे स्थापित राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचा उद्घाटन सोहळा देखील आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे भूषविणार आहेत.


याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे आणि डॉ. वीरभद्र स्वामी यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.