ताज्या घडामोडी

गटसाधन केंद्रात विविध शैक्षणिक कार्यक्रम संपन्न

मानवत /mcr news

मानवत तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव 2024-25 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे . दिनांक 08 आगस्ट रोजी गट साधन केंद्रा मध्ये राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव कार्यक्रम घेण्यात आला.
राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सवृ मा. गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केंद्रप्रमुख मा. श्री, प्रकाश मोहकरे , उमाकांत हाडुळे , ओम मुळे व विलास लांडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे निरिक्षण करण्यात आले. यावेळी पंच परीक्षक मा. श्री अवचट जी एस . श्रीमती कामठेकर व्हि. डी .श्रीमती दाभाडे व्ही.एफ.यांनी स्पर्धेचे गुणांकन उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. या वेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे जाहिर करण्यात आला. या वेळी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शाळेचा विज्ञान नाट्य चमू – प्रथम क्रमांक तर जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय या शाळेचा विज्ञान नाट्य चमू.-द्वितीय क्रमांक तसेच जी.प.मा.शाळा इरळद या शाळेचा विज्ञान नाट्य चमू.-तृतीय क्रमांक
मिळाला तर या वेळी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गटशिक्षणाधिकारी श्री, मनोज चव्हाण यांनी अभिनंदन केले तर या वेळी गट साधन केंद्रातील कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

***
[8/15, 4:11 PM] Press Anil Chavan Sir Manvat: *देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन*
विद्यासागर हायस्कूल मध्ये मोठ्या उत्साहात साजरा

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील मौजे करंजी येथील विद्यासागर हायस्कूल मध्ये *देशाचा ७८ वा,* स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री के एस वसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यालयामध्ये गीत गायन स्पर्धा ,नृत्य स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये इयत्ता पाचवी ते सातवी या गटामध्ये नृत्य स्पर्धेत प्रथम आलेली स्वरूपाली किशोर निर्मळ, द्वितीय वैदही उद्धव निर्मळ तृतीय राजनंदिनी नामदेव निर्मळ तसेच , इयत्ता आठवी ते दहावी या गटातून प्रथम क्रमांक मिळविलेली कुमारी साधना मनोहर जाधव, कुमारी भक्ती बालासाहेब पवार, अदिती अशोक पवार यांचा बक्षीस देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. तसेच समूह नृत्य स्पर्धेत प्रथम आलेल्या कुमारी योगिता दीपक पवार, अक्षरा रामेश्वर पवार, रूपाली ज्ञानोबा पवार, साक्षी तुकाराम पवार, दिपाली त्र्यंबक पवार यांना बक्षीस देऊन सन्ममान करण्यात आला.
तसेच याप्रसंगी उत्तम रांगोळी काढल्याबद्दल साधना जाधव,अनुष्का माणिकराव जाधव, अनुष्का बाबासाहेब जाधव, अपूर्वा विठ्ठल जाधव, रूपाली प्रभाकर हरकळ, साधना काळे, माधवी गायकवाड यांना ही योग्य बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी अपूर्वा जाधव, रोशनी निर्मळ, राजनंदिनी निर्मळ उर्मिला निर्मळ माधवी गायकवाड अनुष्का बाबासाहेब अनुष्का माणिकराव किरण निर्मळ रूपाली हरकळ या विद्यार्थिनींनी “जल ही जीवन है ” ही लघु नाटिका सादर केली. तसेच इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे सादर करून सर्वांचे मन जिंकले. या वेळी संध्या पवार , भक्ती पवार ,समर्थ जाधव, अवचार या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तसेच किरण निर्मळ ,वैदही निर्माळ या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते गायली. तसेच ध्वजारोहण प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना तिरंगा शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानोबा इंगळे यांनी केले तर श्री गाजुलवार यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वरकड,मुळे ,शिंदे ,आसोलेकर ,
वाघमारे ,जाधव ,मुरमुरे यांनी प्रयत्न केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.