इंडियन डेंटल असोसिएशन नांदेडच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप शेषराव दंडे, सचिवपदी डॉ. राहुल कदम तर कोषाध्यक्षपदी डॉ. पांडुरंग श्रीरामे.*

नांदेड: (डॉ. भगवान सूर्यवंशी)
नांदेड येथील नामांकित अशा इंडियन डेंटल असोसिएशन नांदेड ची २०२५ नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली .
यांमध्ये अध्यक्षपदी डॉ. संदीप शेषराव दंडे यांची निवड झाली. शाखेच्या सचिवपदी डॉ. राहुल दौलतराव कदम , तर कोषाध्यक्ष म्हणून डॉ. पांडुरंग दिगंबर श्रीरामे यांची निवड झाली.

याप्रसंगी माजी अध्यक्ष डॉ. मनिष दागडिया यांनी कार्यभार डॉ. संदीप शेषराव दंडे यांच्या स्वाधीन करून, त्यांचे स्वागत केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी नांदेड शहरातील व परिसरातील सर्व दंतरोग तज्ञ डॉ. सुरेश दागडिया, डॉ. अरुण निवळे पाटील, डॉ अनुपमा नळदकर, डॉ. मोतीलाल जांगिड, डॉ. सागर राहेगावकर ,डॉ. मिलिंद पांडुर्णिकर, डॉ. गिरीश जयस्वाल, डॉ. भावना भगत, डॉ. मयूर भट्टड, डॉ. ज्योती जांगिड, डॉ. प्रिया मोगावार, डॉ. स्वाती भगत, डॉ. कपिल कुर्तडिकर, डॉ.अब्दुल मलिक , डॉ. शेख युनूस, डॉ. महेश श्रीमंगले या सर्व लोकांनी उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले.
सचिव डॉ. राहुल कदम यांनी दंत चिकित्सकांचे प्रश्न सोडविण्यावर भर ठेवू असे प्रतिपादन केले. तर अध्यक्ष डॉ संदीप शेषराव दंडे यांनी आभार मानताना वर्ष २०२५ हे आय डी ए नांदेड संघटनेसाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी परिपूर्ण असेल तसेच सामाजिक आणि दंत चिकित्सकिय कामावर केंद्रित असेल असे सांगितले आहे, तर पांडुरंग श्रीरामे यांनी उत्कृष्ट काम करण्याची गवई दिली आहे.
सर्व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा हॉटेल आकृती येथे रविवारी पार पडला. या निवडीबद्दल मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत असून त्यांचे या निवडीबद्दल सर्व क्षेत्रात कौतुक होत आहे.



