ताज्या घडामोडी

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांचे मोलाचे योगदान – डॉ. विशाल पतंगे

नांदेड:( दि.१६ जुलै २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेअंतर्गत कै.श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘मराठवाड्याच्या जडणघडणीमध्ये डॉ. शंकररावजी चव्हाण यांचे योगदान’ या विषयावर पीपल्स महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉ. विशाल पतंगे यांचे विशेष व्याख्यान दि.१५ जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै.डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती समन्वयक डॉ. संदीप पाईकराव यांनी केले.
प्रमुख वक्ते डॉ. विशाल पतंगे यांनी, डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या कार्याचा सैद्धांतिक आढावा घेत डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या कार्याची विस्तारित मांडणी करत उपस्थितांना डॉ.शंकररावजी चव्हाण यांची कार्यपद्धती, शिस्त आणि लोककल्याणकारी भावनेची जाणीव करून दिली.
अध्यक्षीय समारोपात श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य मा.नरेंद्र चव्हाण यांनी,डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठवाड्याच्या विकासासाठी कै.डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी भक्कम पाया रचला. त्यामुळेच मराठवाड्याची तहान भागली. मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी आज तंत्रज्ञानाची नितांत आवश्यकता आहे.
याप्रसंगी मंचावर प्रमुख उपस्थितीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य कविता सोनकांबळे तथा डॉ. हरिश्चंद्र पतंगे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी आपल्या मनोगतात, कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांची अर्थनीती आणि दूरदृष्टीचा परिचय करून देत रोजगार हमी योजनेतील डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या कार्याची जाणीव उपस्थितांना करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप पाईकराव यांनी केले तर आभार डॉ. कैलास वडजे यांनी मानले.
याप्रसंगी यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीचे सदस्य डॉ. गौतम दुथडे, डॉ.मिरा फड, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ.कैलास वडजे, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा.एस.एस.मावसकर, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.कविता केंद्रे डॉ.रत्नमाला मस्के, डॉ. एल.व्ही. पदमाराणी राव, डॉ.व्ही.सी.बोरकर, डॉ. विजय भोसले, डॉ.सुरेश तेलंग, डॉ.अर्चना गिरडे, प्रा.राजश्री जी.भोपाळे, डॉ.संदीप खानसोळे, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ.श्रीकांत जाधव, डॉ. निलेश चव्हाण, डॉ.डी.एस.कवळे, डॉ.एम.डी.अंभोरे, डॉ. संभाजी वर्ताळे, डॉ. मोहम्मद आमेर, डॉ.संजय ननवरे, डॉ.संजय जगताप, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.एस.एम. दुर्राणी, प्रा.भारती सुवर्णकार, डॉ.धनराज भुरे, डॉ.रामराज गावंडे, डॉ.भरत कांबळे, डॉ.अजय मुठे, डॉ.वीरभद्र स्वामी, प्रा.एस.एन.शेळके, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. साईनाथ बिंदगे, परशुराम जाधव, विठ्ठल सुरनर, बळवंत शिंदे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.