ताज्या घडामोडी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस

पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन

नांदेड, दि. ६ जुलै :- गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा गायन/संगीत क्षेत्रामध्ये उत्तम व प्रदीर्घ कार्य करणाऱ्या कलाकारास दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रुपये 10 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सन 2023 व सन 2024 या वर्षीच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निवड समितीची बैठक लवकरच आयोजित करण्यात येत आहे.

यापूर्वी प्रदान करण्यात आलेल्या मान्यवर पुरस्कारार्थींची नावे पाठविण्यात येत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराकरिता नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील पात्र कलाकारांच्या नावांची शिफारस (वैयक्तिक माहितीसह) 13 सप्टेंबर 1993 च्या शासन निर्णयात जोडलेल्या तपशीलाप्रमाणे mahaculture@gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत पाठवावे. आलेल्या शिफारशी समितीसमोर ठेवण्यात येईल, असे आवाहन सहसंचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा.
00000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.