सायंकाळी चार वाजताल्या पासून मानवत शहरा सह परिसरात पावसाची जोरदार हजेरी.
आठवडी बाजारातील व्यापारी वर्गाची तारांबळ उडाली
![](https://mcrnews.in/wp-content/uploads/2024/06/IMG-20240611-WA0035.jpg)
*मानवत / प्रतिनिधी.
आज मानवत शहरात आठवडी बाजार असल्यामूळे तालूक्यातील ग्रामिण भागातून बाजारहाट करण्यासाठी नागरीक आले होते. पण अचानक चार वाजता सोसायट्याच्या वार्यासह काळ्या ढगांनी आकाशात गर्दी केली व ढगांच्या गडगडाटासह चांगलाच पाऊस कोसळला त्यामूळे नागरिकासह व्यापार्यांची तारांबळ उडाली.
आज मानवत शहरासह सह तालूक्यात अनेक ठिकानी सांयकाळी ४ वाजेच्या दरम्यान वार्यासह पावसाचे आगमन झाले. आज दिवसभर वातावरणातील बदलामूळे रात्रीला पाऊस पडेल अशी चर्चा नागरिक करीत होते. पण अचानक सायंकाळी चार वाजता सोसायट्याच्या वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आठवडी बाजारातील व्यापार्यासह बाजारहाट करण्यासाठी आलेल्या माय माऊल्या सह अनेक नागरीकांची तारांबळ उडाली . आज दूपारी चार वाजता सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात बदल होऊन गारवा जानवू लागला तर जोरदार पाऊस मानवत शहरासह परिसरात झाल्याने शेतकर्यामधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
**