यशवंत ‘ चे जलतरण स्पर्धेत लक्षणीय यश -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे
नांदेड:( दि.२५ मे २०२४)
‘यशवंत ‘ मधील प्राध्यापक व विद्यार्थी शैक्षणिक उपक्रमांबरोबरच शिक्षणेत्तर आणि शिक्षणपूरक उपक्रमातही उत्साहाने सहभाग घेतात. प्रा.ओमप्रकाश गुंजकर, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.श्रीरंग बोडके यांचा जलतरण स्पर्धेतील सहभाग आणि यश लक्षणीय असून जलतरण हा आरोग्य सर्वोत्तम ठेवण्याचा उत्कृष्ट व्यायाम प्रकार असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी केले.
श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील प्रा.ओमप्रकाश गुंजकर आणि डॉ.अजय गव्हाणे यांना गुरुमुर्ती स्विमिंग पूल, सिकंदराबाद (तेलंगणा) येथे दि.२२ व २३ मे रोजी पॅन इंडिया मास्टर्स गेम्स फेडरेशन वतीने प्रथम फेडरेशन चषक राष्ट्रीय मास्टर्स गेम्स:२०२४ तर्फे आयोजित जलतरण स्पर्धेतील यशस्वीतेनिमित्त आयोजित सत्कारात ते बोलत होते.
कनिष्ठ महाविद्यालय समाजशास्त्र विभागातील प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना शंभर मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण आणि ५० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि ५० मीटर रिलेमध्ये प्रत्येकी कांस्यपदक प्राप्त झाले आहे तसेच राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय वसंतराव गव्हाणे यांना ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये रौप्य पदक प्राप्त झाले आहे.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या जलतरण स्पर्धेत संपूर्ण देशभरातून ३०० पेक्षा जास्त जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता.
या सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही पदमाराणी राव, डॉ.श्रीरंग बोडके, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, प्रा. नरेंद्र कंचटवार, डॉ.मनोज पैंजणे, प्रा.उत्तम केंद्रे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.संगीता मसारे, प्रा. सौ. एल. एस. लंगडापुरे, डॉ.मुकेश धर्मले, प्रा. श्रीकांत सोमठाणकर, डॉ. एकनाथ मिरकुटे, डॉ.एम.एम.व्ही. बेग, डॉ.वीरभद्र स्वामी, सेवानिवृत्त वनअधिकारी गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किशोर गुंजकर, राजू अडबलवार, माधव डाकोरे आदींनी अभिनंदन केले आहे.