https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

उक्कलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती लेझीम व ढोल ताशाच्या जल्लोषात साजरी..

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील उक्कलगाव जि.प. प्रशाळेत मुख्याध्यापिका श्रीमती मायादेवी गायकवाड मॅडम व सर्व शिक्षक बंधू-भगिनींच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
ढोल ताशाच्या गजरात शोभा यात्रेच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली.
शाळेच्या प्रांगणात कु.सदृषी अंबादास पिंपळे कु.विद्या रामेश्वर पिंपळे व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मायादेवी गायकवाड मॅडम यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये भव्य चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली या मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन केले व विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १८ तास वाचन उपक्रमाची माहिती देत वाचनासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
*मोठ्या उत्साहात व जल्लोषात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

..*
🌷✨🌹✨🌷🙏

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704