https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नागरजवळा जिल्हा परिषद प्रशाळेत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील नागरजवळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी नागरजवळा ग्राम पंचायतीचे सन्माननिय सरपंच मा.श्री.सुरेश होगे पाटील , पोलिस पाटील मा.श्री.सुरेश देंडगे, सन्माननिय ग्राम पंचायत सदस्य श्री.असाराम होगे, शिक्षणप्रेमी नागरिक श्री.विजयराव होगे, पांडुरंग होगे आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री.सोनय्या किर्तनकार यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करूण प्रतिमेस पूष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सपना होगे या विद्यार्थीनीने केले. तर कु.श्रद्धा गोंगे हिने बाबासाहेबांच्या जिवन चरित्र्यावर भाषण केले. तसेच सुरेश देंडगे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी सर्व भारतीय समाज बांधवांना दिला.
असे मत त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर मनोगता मध्ये व्यक्त.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704