https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत शहरात असलेल्या एकमेव उभा शंकर पार्वती मंदिरातील अनोख्या शिव पार्वती विवाह सोहळ्याची जय्यत तयारी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील रंगार गल्लीत असलेल्या उभ्या शंकर पार्वती मंदीरामध्ये तिथी अष्टमी दिनांक 29-3-2023 रोजी. साध्य.7.5वा. *शिव- पार्वती विवाह* सोहळा सपंन्न होणार आहे. त्याची जय्यत तयार सूरू आहे.
सविस्तर वृत्त असे की,
भारतात कूठेच ऊभी शिव पार्वतीची मूर्ती नाही. पण मानवत येथे प. पु. वेदमुर्ती संपन्न शिवैक्य गंगाधर (बापु) जंगम ( स्वामी) यांनी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली आहे.
याच मंदिराच्या पाठीमागे एक विहीर आहे,यातुन एक भुयारी मार्ग आहे याघरवजामंदिराच्या तळमजळ्याखाली नित्य नियमाने पुजा अर्चा करत असताना गंगाधर महाराजांना आकाशवाणी झाली मला या विहीरीतुन बाहेर काढ आणि माझी स्थापना कर, यातुन ही शंकर पार्वती आणि नंदीची मूर्ती सापडली आणि यांची स्थापना केली.
जो भक्त खर्या श्रध्देने मनोभावे भक्ती करेल , यांना या देवतांचे तिनं रूप दिसतात सकाळी प्रहारी. बालपण , दुपारी तरूणपण , सायंकाळी वृध्द पण असे तिन रूप दिसतात, या समोर असलेल्या नदीवर बसुन शंकरपार्वती गावप्रदक्षणा घालतात म्हणून सायंकाळी या मंदिराच्या दरवाजाजवळ थाबुनये असा संकेत आहे.
वैशिष्ट्ये शंकराला चार हात आहेत हातात ञिशुल , रिंग आहे जठेमध्ये गंगा आहे, सोबत पार्वती ही 3.5फुट उंचीची आणि शंकर 4फुट उंचीचे सावळ्या रंगात उभी मुर्ती ही भारतात एकमेव मुर्ती आहे.
या मंदिराचा काळखंड सांगता येत नाही कारण ही अतिप्राचिन मंदिर आहे.
छोट्या अरूंद रस्ता मध्ये एक घरवजा मंदिर बांधले आहे.
*काशिनाथ जंगम परिवारातील जंगम (स्वामी ) परिवार पाच सहा पिढ्यांपासून या मंदिराची सेवा करतात गंगाधर बापु हे या कुटुंबाचे पुर्वज आहे.
आज घडिला *माजी नगराध्यक्ष नंदकुमार महादेव स्वामी (जंगम) आणि परिवार मंदिर सेवाधारी आहे.
उर्वरीत कुटुंब परभणी येथे आहे
*विरेश अण्णासाहेब जंगम (स्वामी), शंभोलिंग अण्णासाहेब जंगम (स्वामी) , महालिंग अण्णासाहेब जंगम (स्वामी) महेश मन्मथ जंगम (स्वामी)
*दिनेश मन्मथ जंगम (स्वामी)
माहिती सादर करते. सामाजिक कार्यकर्त्या *वीरशैव विचार मंच संस्थापक अध्यक्ष चिञकार महेश मन्मथ जंगम (स्वामी) यांनी या विवाह सोहळ्या विषयी माहीती दिली.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704