https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

ग्रामिण रोजगार हमी योजनेतील विहिरीचे खोदकामे जेसीबी यंत्राच्या साह्याने होत असल्याने रोजगारावर उपासमारीची वेळ.

चौकशी करून कारवाई करा ! अन्यथा २ मे रोजी आत्मदहनाचा ईशारा.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील मौजे मानोली येथे मानोली ग्राम पंचायतीचे सरपंच व रोजगार सेवक यांच्या संगणमताने विहिरीचे यंत्राच्या साह्याने खोदकामे करण्यात येत असून त्यामूळे कामगारावर उपारमारीचे संकट ओढावले असल्याची तक्रार गावातील नागरीकांनी मानवत पंचायत समितीच गटविकास अधिकारी यांच्याकडे एका निवेदना द्बारे करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की,
राज्यशासनाने मागेल त्याला विहिर दिली असून त्यामूळे ग्रामिण रोजणदारी कामगारांना काम मिळून त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटेल असे असतांनाही मानोली येथे ग्राम रोजगार सेवक व सरपंच यांच्या मनमानी व संगणमताने मजूरा ऐवजी यंत्राने विहिरीचे खोदकामे करण्यात येत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे नागरीकांनी केल्याने खळबळ ऊडाली.
म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत विहिर खोदकामास मजुरांच्या सहाय्याने न करता जेसीबीने करत असले मूळे मजूरावर उपासमारीची वेळ आली असल्याची तक्रार संतोष सदाशिव शिंदे, सुरेश बालासाहेब मांडे मानोली येथील रहिवाशी असून मौजे मानोली येथील ग्रामरोजगार सेवक व सरंपच व काही एजंट हे एकमेकांशी संगणमत करुन मजुरांच्या सहाव्याने विहिरीचे खोदकाम न करता शेतक-यांकडून अतिरीक्त पैसे घेवून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करीत आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे, मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. तसेच काही वयोवृध्द मजुरांची देखील नावे लेबरकार्ड मध्ये टाकण्यात आलेलीआहेत. येथील ग्रामरोजगार सेवक, सरपंच व काही एजंट यांची चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व मजुरांना रोजगार मिळवून देण्यात यावा ही नम्र विनंती. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दिनांक 02/05/2024 रोजी आत्मदहन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी व होणा-या सर्व परिणामाची संपुर्ण जबाबदारी आपल्या लोक कल्याणकारी पंचायत समिती प्रशासनावर राहिल. असा ईशारा दिलेल्या निवेदनाद्बारे संतोष सदाशिव शिंदे, सुरेश बाळासाहेब मांडे यांनी प्रशासनाला दिला आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704