https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

रॉयल क्लिफ वर्ल्ड स्कूलमध्ये बाल पदवीदान समारंभ संपन्न….

मानवत // प्रतिनिधी.

आज दिनांक 16 एप्रिल वार मंगळवार रोजी मानवत शहरातील रॉयल क्लिफ वर्ल्ड स्कूलमध्ये बाल पदवीदान समारंभ संपन्न झाला.

या पदवीदान समारंभा प्रसंगी संस्थेच्या सचिव सौ. प्रेरणाताई समशेर वरपूडकर, प्राचार्य अर्चनाताई शुक्ला, प्रशासकीय अधिकारी सौ. जयश्रीताई सोरेकर, मुरलीधरजी रोडे आदींची प्रमूख उपस्थिती होती.
यावेळी पदवीदान समारंभा प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
जुनिअर के.जीच्या विद्यार्थ्यांनी *इतनी शक्ती हमे देना दाता* ‘ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असा नृत्य अविष्कार सादर केला.
या प्रसंगी प्राचार्य अर्चनाताई शुक्ला यांनी आपलं मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तर यावेळी युकेजी च्या विद्यार्थ्याने विविध वेशभूषा करून विविध कला, भाषणे, गीते सादर केली.
बाल विद्यार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते बाल पदवीचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी कार्यक्रमाला पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.
यावेळी पालकांनी बाल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डेब्रा लेवी मॅम ,लिलीयन स्मिथ मॅम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्लीन दिलनारस , अंद्रिया लेवी, सानिका आळसपुरे, जया इंगोले,मेघना काळे, ऋतुजा जगताप व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704