https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आज नांदेडमध्ये युवा मतदार मेळावा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन

नांदेड,12 एप्रिल- मतदार जनजागृतीसाठी उद्या नांदेड येथे युवा मतदार मेळावा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नांदेड विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी दिली आहे.

16- नांदेड लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हास्तरावरून स्वीप कक्षामार्फत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये उद्या शनिवार दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता शंकरराव चव्हाण प्रेषकगृह येथे युवा मतदार मेळावा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर चर्चासत्रात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिनल करनवाल, धर्माबाद येथील उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

तरी या मेळाव्यास महाविद्यालयीन युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704