https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

रमजान निमित्त अल्फा फाउंडेशनच्या वतीने रमजान अन्नधान्य किटचे वाटप

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरात अल्फा फाउंडेशनच्या वतीने रमजान रेशनिंग किटचे वाटप करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, अल्फा फाउंडेशन गेल्या 5 वर्षापासून गोरगरिबांना अन्न धान्य चे किट म्हणजे रमजान किट सातत्याने वाटप करीत आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे या महिन्यात मुस्लिम समाजातील लोक रोजे (उपवास) धरतात. रमजान या पवित्र महिन्याचा इस्लाम मध्ये खूप महत्त्व आहे. रमजान मध्ये रोजा, नमाजसह दानधर्माला देखील पुण्याचं काम मानलं जातं. याच शिकवणीतून मानवत शहरातील अल्फा फाउंडेशन च्या वतीने गरजू कुटुंबीयांना रेशनिंग किट चे वाटप करण्यात आले. या किटला रमजान रेशन किट असे नाव देण्यात आले होते.रेशनिंग किट मध्ये तांदूळ, तेल, साखर, पत्ती, दाल, असे एकूण 13 पदार्थ व शिरखुरम्या साठी लागणारा सुखामेवा यासारखा पदार्थाचा समावेश होता. जवळपास शहरातील 70 गरजू कुटुंबीयांना यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी अल्फा फाउंडेशन चे सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमासाठी शहरातील तरुणाने घेतलेल्या पुढाकाराचं मानवत शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704