निलवर्ण टाकळी येथे श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा व शोभायात्रा संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातील निलवर्ण टाकळी येथे दि २६/०३/२०२३.. रविवार रोजी गावामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वती ने श्री स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मानवत तालूक्यातील निलवर्ण टाकळी येथे स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने पालखी सोहळा व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .
त्यामूळे सर्व सुवासनीनी आप आपले अंगणात स्वच्छ करून सडा शिंपडून रांगोळी काढल्या त्या मूळे गावातील वातावरण भक्तीमय झाले होते. तसेच गावकरी भक्त मंडळी मोठ्या संख्येने पालखी सोहळा व शोभायात्रेत सहभागी झाल्याने शोभा वाढली तसेच या वेळी सर्वांनी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आल्याने सर्व बालगोपाळासह ग्रामस्थ या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
पालखी वेळ – सकाळी ९ वाजता नैवेद्य आरती सकाळी १०:३० वाजता.
प्रश्नोत्तर कार्यक्रम आरती नंतर लगेचच श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र मारोती मंदिर टाकळी निलवर्ण भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला.
***