https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

रूढी जिल्हा परिषद शाळेत ” सन्मान बालकांचा ” आणि सोहळा बक्षिसांचा कार्यक्रम संपन्न

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. रूढी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १७ मार्च रोजी अतिशय उत्साह वर्धक वातावरणात *सन्मान बालकांचा सोहळा बक्षीसांचा* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यक्रम सोहळ्याचे उदघाट्न शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रामप्रसाद होंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेशराव होंडे, माणिकराव होंडे यांच्या सह शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननिय सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहूणे केंद्रप्रमुख शिरीषजी लोहट, मुख्याध्यापक गोरोबा काका बनसोडे यांच्या शुभहस्ते रोपांना जलार्पण करून सोहळ्याचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी *मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा* अभियानात मराठवाडा विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या मानवत येथील केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख श्री. शिरीष लोहट व मुख्याध्यापक श्री. गोरोबा काका बनसोडे यांच्या ऊत्कृष्ट कार्याचा गौरव करताना शालेय व्यवस्थापन समिती रुढी यांच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या नव्हत्या त्याचे कारण म्हणजे समृद्ध आणि सुखी शेतकरी तसा समृद्ध शेतकरी आणि सुजाण नागरिक होण्यासाठी आजचा बालक शिकला पाहिजे आणि व्यावसायिक शिक्षण घेऊन स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे या साठी समस्त पालकांनी विद्यार्थी शिक्षक आणि शाळेच्या पाठीमागे खंबीरपणे ताकद उभी केली पाहिजे माता पालकांनी उपवास तापास न करता आपली मुलगी आपला मुलगा उत्तम शिक्षण कसे घेईल या साठी जीवन तपस्या केली पाहिजे असे मनोगत व्यक्त करीत शाळेतील विविध उपक्रमाबद्दल पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन करून श्री शिरीषजी लोहट यांनी शाळेला शुभेच्छा दिल्या तर मुख्याध्यापक गोरोबा काका बनसोडे यांनी लोकसहभागा शिवाय शाळेच्या समृद्ध विकासास पर्याय नाही असे मत मांडले. शाळेत या वर्षी IEO, IMO, NSO OLYMPIAD परीक्षेत इयत्ता सातवी मधिल ०८ गुणवंत विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल प्राप्त झाले त्यांचा सत्कार व प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित केलेल्या विविध १४ INDOOR & OUTDOOR खेळातील विजेत्या खेळाडू आणि संघांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ९२२ विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षात नो दप्तर डे, रात्र अभ्यास गट, माझी वसुंधरा, शिक्षण माझे लक्ष, आई बाबांचे, मिशन इंग्लिश स्पिकिंग, अध्ययन निष्पत्तीचे भविष्यवेधी शिक्षण इत्यादी उपक्रमांची यशस्विता विद्यार्थी गुणवत्ता आणि पालकांची सक्रियता वाढवण्यात सहाय्यभूत ठरले आहेत असे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले. या वेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब घनचक्कर, सर्वश्री शिक्षक गंगाधर कंकाळ, सोपान नाईकनवरे, गंगाधर शिंदाळकर, उमाकांत हाडूळे, शिक्षिका श्रीमती निर्मलाताई घारोळे, श्रीमती सारिकाताई ढगे, श्रीमती रोहिणीताई खोंडे, श्रीमती माधुरीताई महाजन यांनी कार्यक्रम सोहळ्यात सक्रिय पुढाकार घेतला. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब घनचक्कर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उमाकांत हाडोळे यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार श्री गंगाधर कंकाळ यांनी यांनी मानले. या वेळी सर्व बक्षीस वितरणाचे नियोजन श्रीमती रोहिणीताई खोंडे यांनी केले होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704