https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

उक्कलगाव जिल्हा परिषद शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. उक्कलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आज स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्ग आठवीतील सर्व विद्यार्थी यावेळी शाळेमध्ये शिक्षक स्वरूपात दाखल झाले होते शाळेचे वर्ग पाचवी ते आठवीचे मुख्याध्यापकपद शाळेची विद्यार्थीनी कुमारी विद्या रामेश्वर पिंपळे व वर्ग पहिली ते चौथीचे मुख्याध्यापक पद कुमारी अंकिता अंकुश पिंपळे तर उपमुख्याध्यापक म्हणून कुमारी वर्षा अच्युतराव उक्कलकर या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट रित्या जबाबदारी स्विकारून ती ऊत्तम रित्या पार पडली वर्ग पहिली ते आठवी च्या प्रत्येक वर्गावर कोणता विषय कोणी शिकवायचा याचे योग्य नियोजन शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती अलका सातपुते यांनी तयार करून दिले. शाळेतील सर्व विद्यार्थी वर्गात येऊन शिकवणाऱ्या शिक्षकांना ही छान असा प्रतिसाद देत होते विद्यार्थ्यां मध्ये सभाधिटपणा, सामंजस्य व नेतृत्व गुण यावा या साठी हा उपक्रम शाळेमध्ये घेण्यात येत असतो जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मायादेवी गायकवाड व शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनीनी वर्ग इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कौतुक केले दरम्यान आपल्या पेक्षा वयाने मोठे असलेल्या विद्यार्थ्यांचे आपण ऐकले पाहिजे ही भावना या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मना मध्ये निर्माण झाली व स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहासह आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करूण परिश्रम घेतले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704