https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मंडळाधिकारी जगन्नाथ बीडवे यांना *बे दम* मारहाण प्रकरणी मानवत पो.स्टे मध्ये दोघावर गून्हा दाखल.

भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५३ ; ३३३ ; ५०४ ;५०६ ;३४, भादवी, मानवत पो.स्टे. मध्ये गून्हा दाखल.

मानवत // प्रतिनिधी.

मानवत महसूल विभागाचे कर्मचारी व केकरजवळा मंडळाचे मडळाधिकारी जगन्नाथ बीडवे यांना *बे दम* माहराण केल्या प्रकरणी बीडवे यांच्या तक्रारी वरुन मानवत पो.स्टे. मध्ये दोघावर गून्हा दाखल.
सविस्तर वृत्त असे की,
दिनांक 13/03/2024 मी जगन दगडूबा बिडवे, वय 56 वर्ष, व्यवसाय नौकरी, मंडळ अधिकारी तहसिल कार्यालय, मानवत समक्ष सरकारी दवाखाना मानवत येथे उपचारकामी शरीक असतांना जबाब देतो की, मी वरील प्रमाणे असुन मागील दोन वर्षापासुन तहसिल कार्यालय, मानवत येथे मंडळ अधिकारी म्हणुन कार्यरत आहे. मी महसुल मंडळ मानवत व अतिरीक्त पदभार महसुल मंडळ मौजे केकरजवळा येथील कामकाज पहातो.
काल दिनांक 12/03/2024 रोजी रात्री 11.00 वा. तहसिलदार श्री पांडूरंग माचेवाड साहेब यांना रेतीची चोरटी वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्याने अवैध रेती वाहतुक करणारे वाहनावर कार्यवाही कामी मी व तहसिलदार पांडूरंग माचेवाड साहेब, तलाठी गोरे, जाधव, तवर व कोतवाल अमोल भिसे असे आम्ही शासकिय वाहनाने अवैध रेती वाहतुक करणारे वाहनावर कार्यवाही कामी निघालो होतो. दिनांक 13/03/2024 रोजी पहाटे 04.00 वा. मौजे केकरजवळा येथे असतांना आम्हाला वाघाळा
फाटाकडुन एक हायवा ट्रक येत असतांना दिसला आम्ही तो ट्रक थांबवला त्याचा पासींग क्र. MH 40 Y 1795 असा होता. आम्ही ट्रक चालक यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन बालासाहेब पाटील
रा. मुदगल असे सांगीतले.
सदर हायवा टिप्परमध्ये काय आहे ? असे विचारले असता त्याने वाळु असल्याचे सांगीतले आम्ही त्यास रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याने नसल्याचे कळवलेने आम्ही सदर हायवा वाहन कार्यवाही कामी ताब्यात घेवुन तहसिल कार्यालय, मानवत येथे उभा केले व योग्य ती कार्यवाही केली.
दुपारी 01.45 वा. मी व तलाठी गोरे असे मोटार सायकलवर पिकपेरा व संचिका तपासणी साठी तलाठी कार्यालयात जात असतांना गेटवर तहसिलचे अमोल भिसे कोतवाल यांना 1) विठोबा मारोती घाडगे रा. मुदगल 2)लक्ष्मीकांत शेपेराव तिडके, रा. मुदगल हे तुम्ही आमची गाडी कशी काय पकडली तुम्हाला अधिकार आहे काय? असे म्हणत होते. आम्ही त्यांचे जवळ जाऊन त्यांना तहसिलदार साहेब यांना भेटा असे म्हणालो असता 1) विठोबा घाडगे याने त्याचे हातातील काहीतरी वस्तु माझे तोंडावर मारल्याने मी गंभीर जखमी होऊन खाली पडलो असता लक्ष्मिकांत तिडके याने माझे पोटात लाथा मारुन मला मार दिला.
तेथे जमलेले लोकांनी व तलाठी गोरे कोतवाल भिसे यांनी मला त्याचे तावडीतुन सोडवले असता त्यांनी मला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
तरी आज दिनांक 13/03/2024 रोजी दुपारी 01.45 वा. मी शासकिय कामकाज करत असतांना आम्ही 1) लक्ष्मीकांत तिडके, विठोबा घाडगे यांची रेतीची चोरटी वाहतुक करणारी हायवा गाडी पकडली असता त्याचा राग धरुन त्यांनी मला काहीतरी वस्तु मारुन गंभीर जखमी करुन बे ! दम मुक्कामार दिला व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
म्हणुन माझी त्यांचे विरुध्द तक्रार आहे. एम. एल. सी. जबाबा वरुन मानवत पो.स्टे मध्ये गून्हा दाखल करण्यात आला.
पूढील तपास मानवत पो.स्टेचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक दिपक दंतूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704