https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

शाखा व्यवस्थापकाची मनमानी ; तालूक्यातील शेतकर्‍यामधून संताप.

सक्तीने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याच्या खात्यास बँकेने लावलेले निर्बंध ( होल्ड ) तात्काळ थांबवा त्रस्त शेतकर्‍यांची मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्याकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.

राष्ट्रीय कृत्त स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेने सक्तीने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याच्या चालू व बचत खात्यास लावलेले निर्बंध (HOLD) तात्काळ थांबवा अशी मागणी तालूक्यातील कोथाळा येथील शेतकऱ्याच्या वतीने मानवत तहसिलचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,
तालूक्यातील शेतकर्‍यासाठी असलेल्या राष्ट्रीयकृत्त बॅक आॅफ इंडिया शाखा व्यवस्थापक यांच्या मनमानी कारभारामूळे शाखाव्यवस्थापकांनी शेतकर्‍यांच्या खात्यावर होल्ड लावल्याने तालूक्यातील शेतकरी अडचनीत आला असून त्यामूळे खात्या वरील निर्बंध हटवून घेवान देवान करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तहसिलदार यांना यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. मानवत तालुक्यातील कोल्हा मंडळ, मानवत मंडळ हे दुष्काळदृष्य घोषित करण्यात आलेले असून या महसूल मंडळाना शासनाच्या सवलती नुसार शेतीशी निगडीत कर्ज वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. तरी वरील सवलतीचा लाभ हा मंडळास मिळयला हवा पण मानवत येथील राष्ट्रीयकृत्त स्टेट बँकेने शेतीवरील पिककर्ज भरु न शकणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर सक्तीने चालु आणि बचत खात्यावर निर्बंध (होल्ड) लावत आहे.
यामुळे नागरीकांना जिवनाआवश्यक गोष्टीसाठी जमा असलेल्या पैशाचा कोणता ही उपयोग होत नाही. यामध्ये अनेक अपंग, जेष्ठ नागरीक आहेत यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. यामुळे अनेक लोकांना शासनाच्या दुष्काळमुळे आलेला निधी वापरता येत नाही तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत जमा होणारी मजुरी ही उचलता येत नाही यामुळे दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. मानवत तालुक्यातील मौ. कोथाळा येथील नागरीक १५ मार्च रोजी मानवत येथील स्टेट बँक शाखेत चौकशीसाठी गेले असता सदरील बँक कर्मचारी हे वरिष्ठाकडूनच असे आदेश आहेत असे सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे अगोदरच शेतकरी दुष्काळाने होरपळलेला असताना जेष्ठ नागरीक, अपंग, महिला, शेतकरी, रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरांना व शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यावरील निर्बंध (होल्ड ) बँकेने तात्काळ थांबवावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून निवेदनावर वृषेन पाते, मारोती फाटे, देविदास पाते, परशुराम पाते, उत्तम गोरे, रघुनाथ सिद्धनाथ, राहुल सम्रतकर, मारोती पाते, सोमित्र फाटे, कृष्णा पाते , यांच्या सह त्रस्त शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शाखाव्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामूळे तालूक्यातील संकटात सापडलेल्या शेतकर्‍या मधून संताप व्यक्त केल्या जात आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704