https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथे अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या निवड चाचणीनीचे काॅग्रेसचे शामभाऊ चव्हाण , बाबासाहेब आवचार यांच्या हस्ते उदघाटन.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने व मानवत स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित पुरुष आणि महिला वरिष्ठ गट जिल्हा अजिंक्य पद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवारी पार पडल्या. या मधील विजेत्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.

यावेळी स्पर्धेचे उद्घाटन मानवत तालूका काँग्रेस कमेटीचे मानवत तालुकाध्यक्ष बाबासाहेब आवचार व मानवत शहर काॅग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष मा. शामभाऊ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
मानवत शहरातील श्रीमती सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालया च्या मैदानावर पुरुष व महिला
वरिष्ठ गट निवड चाचणी पार पडली. या कबड्डी स्पर्धे मध्ये पुरुष गटांमध्ये साई क्रीडा मंडळ खेडूळा या संघाने अजिंक्य पद पटकावले तर उपविजेता युनिटी फाउंडेशन परभणी, तृतिय राजे शिवाजी क्रीडा मंडळ कोल्हा, चतुर्थ मानस स्पोर्ट्स अकॅडमी, सेलू तर महिला गटामध्ये अजिंक्यपद मानवत स्पोर्ट्स अकॅडमी, मानवत, उपविजेता आनंदवन क्रीडा मंडळ, तृतीय आनंदवन, गंगाखेड तर स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई पट्टू विजय तारे, उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक सचिन माने यांनी पटकावले तर यावेळी महिला गटा मध्ये उत्कृष्ट चढाई पट्टू निकिता लंगोटे व उत्कृष्ट पकड आरती चव्हाण यांनी पटकावले. बक्षीस वितरण प्रसंगी परभणी जिल्हा कबड्डी संघटनेचे
सचिव मंगल पांडे, प्रकाश हरगावकर, गुलाब भिसे, प्रा डॉ. ज्ञानेश्वर गिरी, प्रा माधव शिंदे, पी.आर जाधव, गोपाळ मोरे, दत्ता भिसे, तुकाराम शेळके, भारतराव धनले, राजेश राठोड, प्रशांत नाईक भरत घाडगे, विठ्ठल तारे यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी पंच म्हणून योगेश जोशी, कलीम शेख, मुन्ना जगतकर, राहुल आंबेकर, धनंजय नखाते, मेघराज कांदे, संदीप धनले, अर्जुन भिसे यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा. गणेशजी दहे, मुंजाभाऊ पानझाडे, सर्जेराव भिसे, बालासाहेब पिंपळे, आसेफभाई पठाण व मानवत स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू यांनी काम पाहिले. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिसे यांनी केले तर यावेळी सर्व मान्यवरांचे आभार ज्ञानेश्वरजी ठोंबरे यांनी मानले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704