https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. हमीद खाॅन यांची बदली तात्काळ थांबवा* *भारतीय जनता पार्टीची जिल्हा शैल्यचिकित्सक यांच्याकडे मागणी.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. हमीद खान यांची होणारी बदली प्रक्रिया तात्काळ थांबवा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मानवत तालुका उपाध्यक्ष अमोल कुऱ्हाडे यांनी एका निवेदनाद्वारे परभणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कडे केली आहे.
मानवत ग्रामीण रुग्णालयातील कर्तव्यदक्ष वैद्यकिय अधिकारी डॉ. हमीद खाॅन हे गेल्या काही महिण्या पासून मानवत ग्रामिण रूग्णालयात कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्य काळात अनेक गोर गरीब रुग्णांना अतिशय चांगल्या पध्दतीने औषधो उपचार केले आहेत तसेच मतिमंद रुग्णांना जवळ घेवून त्यांच्या आरोग्या बाबत काळजी घेतात या कारणामुळे त्यांचे नागरीका मधून व ग्रामिण रुग्णालयाचे सर्वत्र कौतूक होत आहे. तसेच स्व,खर्चाने गोर गरीब व मतीमंद लोकांची चांगल्या प्रकारे रूग्ण आरोग्य सेवा करीत असतात त्यांचे कार्य कौतुका स्पद असून त्यामुळे डॉ. हमीद खाॅन यांची होणारी बदलीचे आदेश धडकले असून त्यांची बदली थांबवून त्यांना मानवत ग्रामीण रुग्णालय येथेच कायम ठेवण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे मानवत तालुकाउपाध्यक्ष अमोल कुऱ्हाडे, शहर उपाध्यक्ष रविभाऊ वाघमारे, गणेशजी शर्मा यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांची या वेळी उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704