https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत महाविद्यालयामध्ये वाय.एम. झेप कार्यक्रमाचे उत्साहात उद्घाटन*

नांदेड:(दि.२८ फेब्रुवारी २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही वाय.एम.झेप २०२३-२४ या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली श्री.दत्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हदगाव येथील वाणिज विभागप्रमुख डॉ.संजय जाधव पाटील यांच्या हस्ते व उपप्राचार्य तथा वाणिज्य विभागप्रमुख डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांच्या उपस्थितीत दि. २७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
या प्रसंगी उद्घाटनपर मनोगतात डॉ.संजय जाधव पाटील म्हणाले की, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत भरपूर संधी असून त्या संधीचे सोने करण्यासाठी प्रामाणिकपणा, मेहनत करण्याची जिद्द, ज्ञान व कौशल्य असणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ज्ञान व कौशल्य हे सर्वच विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना असणे ही काळाची गरज आहे. या शाखेतील विद्यार्थ्यांना फार मोठ्या संधी निर्माण होत आहेत.
प्रारंभी प्रास्ताविक उपप्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांनी केले.
वाय.एम.झेप हा एक आगळा वेगळा उपक्रम असून या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमधील सादरीकरण कौशल्य विकसित करण्यासाठी “कॉमर्स एज्युकेशन अँड सस्टनेबल डेव्हलपमेंट गोल्स” या विषयावर पी.पी.टी. सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाला.
सूत्रसंचालन कु.श्रुती पांचाळ व कु.आइशा झूहा यांनी केले तर कु.लिझना विराणी हिने आभार मानले.
उदघाटन सोहळ्यानंतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ५० पेक्षाही अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी कु.स्नेहा खिल्लारे, कु. नेहा वाढवे, कु.लिझना विराणी, कु. आयेशा झुहा व सोहम देशपांडे त्याचबरोबर उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे,डॉ.आर.एल.सोनटक्के, डॉ. मो.आमेर, प्रा. भारती सुवर्णकार, प्रा.सोनाली वाकोडे, प्रा.प्रियांका सिसोदिया, डॉ.आत्माराम जाधव, डॉ.बी. एस.तुरईकर, प्रा.विठ्ठल राठोड, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील, प्रसिद्धी समिती समन्वयक डॉ. अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704