https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

माजी मुख्यमंत्री मा.खा.श्री. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचा सत्कार

*
नांदेड:(दि.२९ फेब्रुवारी २०२४)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.खा.श्री. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र स्टेट एक्वेटिक असोसिएशनतर्फे मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया एक किलोमीटर सागरी खाडी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेतील विजयाबद्दल प्रा. ओमप्रकाश गुंजकर यांना पदक, प्रमाणपत्र, रोख रक्कम आणि स्विमिंग किट महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन तर्फे प्राप्त झालेली आहे. या स्पर्धेत भारतातील एकूण ४०० पेक्षा जास्त जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता.
या सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधिक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील, डॉ.एल.व्ही.पदमारानी राव, डॉ.एम.एम.व्ही. बेग, डॉ.श्रीरंग बोडके, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.रामराज गावंडे, डॉ.मनोज पैंजणे, प्रा.नरेंद्र कंचटवार, डॉ.एकनाथ मिरकुटे, प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रा.सचिन महिंद्रकर, प्रा.उत्तम केंद्रे, प्रा.सचिन अपस्तंभ, डॉ.भास्कर देशमुख, बालाजी गाडे, सेवानिवृत्त वनअधिकारी गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक किशोर गुंजकर, श्रीकांत गुंजकर आदींनी अभिनंदन केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704