https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

महिला सक्षमीकरणाकरिता स्त्रीवाद महत्त्वाचा _प्रोफेसर डॉ. लक्ष्मण जोगदंड

नांदेड:

प्रतिभा निकेतन महाविद्यालय ,नांदेड येथे 8 मार्च रोजी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्रीवाद आणि महिला सक्षमीकरण या विषयावर 1 मार्च 2023 रोजी व्याख्यानाचे आयोजन इंग्रजी विभागाद्वारे करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाकरिता समाजा मध्ये आवश्यक असलेले धोरणात्मक बदल याविषयी माहिती देऊन सामाजिक जबाबदारी विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रोफेसर डॉ. लक्ष्मण जोगदंड, इंग्रजी विभाग प्रमुख, महात्मा गांधी कॉलेज, अहमदपूर तसेच इंग्रजी अभ्यास मंडळ सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणात स्त्री वादाची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन प्रोफेसर डॉ. लक्ष्मण जोगदंड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर, सहयोगी अधिष्ठाता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड , हे होते . उपप्राचार्य डॉ. दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास लाभली होती. प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्वाती तांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाच्या औचित्त्याने इंग्रजी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या भित्तिपत्रकाचे उद्घाटन प्रोफेसर डॉ. लक्ष्मण जोगदंड यांच्या शुभहस्ते करण्यात. यानंतर 15 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 या काळात घेण्यात आलेल्या शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश कम्युनिकेशन अँड आय. टी. स्किल्स या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र सहभागी यशस्वी विद्यार्थ्यांना देण्यात आले.
त्यानंतर स्त्रीवाद आणि महिला सक्षमीकरण या विषयावर प्रोफेसर डॉ. लक्ष्मण जोगदंड यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले .स्त्रीवाद ही एक विचारप्रणाली असून, स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार आणि संधीचा पुरस्कार करते. पुरुषप्रधान समाजामध्ये अनेक दुहेरी मानके स्त्रियांवर लादली जातात . स्त्री आणि पुरुष यांचे वर्तन आणि नैतिकते विषयीचे समाज मानके कशी भिन्न आहेत याविषयी रोजच्या जीवनातील विविध दाखले देऊन सखोल मार्गदर्शन डॉ. जोगदंड यांनी केले. समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी, अन्यायाला आव्हान देण्यासाठी,, सर्वांसाठी अधिक समावेशक न्याय समाज निर्माण करण्यासाठी , स्त्रीवाद समजून घेऊन सक्षमीकरणा करिता प्रयत्न करणे किती गरजेचे आहे याची जाणीव डॉ. जोगदंड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिली.
अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांनी केला. साहित्य हा समाजाचा आरसा असून त्यात समाजातील विविध कालखंडातील प्रचलित मूल्ये, श्रद्धा, चालीरीती आणि संघर्ष यांचे प्रतिबिंब असते. साहित्य हे वाचकांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा विविध समस्यांवर गंभीरपणे विचार करण्यास प्रोत्साहित करते. वाचाल तर वाचाल असा असा कानमंत्र ही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जुनेद मिर्झा यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रुकसाना सय्यदा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता श्री. राजेश आयंगार, प्रा. भाग्यश्री मदेवाड, बलजीत कौर, अपूर्वा पालीमकर, आयशा सिद्दिकी, मुस्कान सय्यद, आरती ठक्कर, अशोक काळे, माधव घोरबांड यांनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704