https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

पोलिसांच्या नाकावर टिच्चुन केली पोलिसाच्या गाडीची चोरी भाग्यनगर हद्दीतील घटना

नांदेड: नांदेड शहरालगत असलेल्या वाडी भागातील डी मार्ट शेजारी असलेल्या कृष्णा नगर येथे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये जमादार असलेले सचिन मारोती गायकवाड हे अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत.आज दिनांक ३ मार्च २०२४ च्या मध्य रात्री रात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोर उभी असलेली अल्टो कार क्रमांक MH23Y2934 चोरुन नेली.
याच कृष्णा नगर भागात काल दिं २ च्या मध्यरात्री एका नवीन कार ला जाळण्यात आले सदर जळालेल्या कारचे मालक श्री शिंदे हे शासकीय कंत्राटदार असून ते या भागात किरायाने राहतात त्यांच्या घराच्या बाजूच्या रिकाम्या मोकळ्या जागेत वाहन उभे केले असता अज्ञातांनी सदर नवी कोरी वेन्यू कार कृष्णा नगर वाडी येथील उमेश गिरी यांच्या प्रॉपर्टी कन्सल्टन्सी ऑफिसच्या समोरील मोकळ्या जागेत सदर वाहन जाळण्यात आले

यावरून भाग्यनगर पोलीस स्थानकातील कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या सेवेसाठी किती तत्पर आहेत हे दिसून येत आहे या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी या भागातील सर्व नागरिकांनी पोलिसांनी या ठिकाणी पोलीस चौकीची स्थापना करावी अशी मागणी जोर धरत आहे

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704