https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यासाठी ऊल्लेखनिय कार्या बाबत सोनवळकर यांचा गौरव*

मानवत / प्रतिनिधी.

नुकत्याच पारपडलेल्या परभणी लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यासाठी मानवत आय .टी.आय. चे निदेशक मधुसूदन सोनवळकर यांची नियुक्ती मतदानयंत्र सह .प्रमुख तथा मास्टर ट्रेनर या पदावर ९८ पाथरी मतदार संघासाठी करण्यात आली होती.
श्री सोनवळकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी मा . शैलेषजी लाहोटी . व तहसिलदार मानवत तथा मतदान यंत्र नोडल अधिकारी पांडूरंग माचेवाड यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण ३९८ मतदान केंद्रासाठी मतदान यंत्र विषयक केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण देणे ‘ मतदान यंत्र मतपत्रिकेसह निवडणूक कार्यासाठी तयार करताना सनियंत्रन करणे ‘ मतदान केंद्राध्यक्ष निदेश संचिका तयार करणे विविध निवडणूक प्रशिक्षण तालुका स्थरावर आयोजन करणे ‘ मतदान साहीत्य वाटप व स्विकृती सनियंत्रन करणे तसेच मतदान चालू असतांना संपूर्ण ३९८ मतदान केंद्रावर नियुक्त मास्टर ट्रेनर व बॅकअप टीम यांच्याशी समन्वय करून मतदान प्रक्रीया सुरळीत करणे व मा. जिल्हाधिकारी कार्यालयाला निवडणूक मतदान यंत्र विषयक अहवाल वेळोवेळी सादर करणे इत्यादी निवडणूक कार्य उल्लेखनिय रीत्या पूर्ण केल्या बाबत श्री सोनवळकर यांचा मा . सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शैलेषजी लाहोटी यांनी प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला आहे निवडणूक कार्य चांगले प्रकारे पूर्ण केल्या बाबत नोडल अधिकारी तथा तहसिलदार मानवत पांडूरंग माचेवाड तहसिलदार पाथरी शंकर हांदेशवार ‘ तहसिलदार सोनपेठ सुनिल कावरके ‘ नायब तहसिलदार मानवत जिवन
धारासुरकर ‘ श्री वसंत महाजन व निवडणूक विभाग पाथरीचे पेशकार श्री अन्नपुरे ‘ पीटले ‘ मदन चव्हाण जामकर ‘ पाथरी आयटीआय प्राचार्य देशपांडे ‘ क्षेत्रिय अधिकारी डॉ .मोरे डॉ . पेरके व मानवत आय टी आय चे प्रभारी प्राचार्य मनोज माळवदे यांनी सोनवळकर यांचे अभिनंदन केले आहे ‘ मागील अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवत सोनवळकर यांनी निवडणूक कार्याचे प्राप्त पोलडे मानधन रू. १४०० / _ सैनिक कल्याण कार्यासाठी देणगी देऊन राष्ट्रीय कार्यातील सहभाग कायम ठेवला आहे. सोनवळकर यांचे सहकारी मास्टर ट्रेनर विलास मीटकरी ‘ शशिकांत नेवरेकर ‘ माणीक घाटूळ पटेकर ‘ मुळे ‘ रोकडे व पवार यांनाही चांगल्या निवडणूक कार्याबाबत प्रशस्तीपत्र देऊन मा . शैलेषजी लाहोटी यांनी गौरव केला आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704