https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत तालुक्यातील रत्नापूर येथे जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्याची उत्साहात सुरुवात

मानवत तालुक्यातील रत्नापूर येथे जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्याची उत्साहात सुरुवात

> जिल्हाभरातून मेळाव्यात विदयार्थ्यांचा सहभाग < ______________________________________ मानवत / प्रतिनिधी. परभणी भारत स्काऊट्स अँड गाईड जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग प्राथमिक तथा माध्यमिक जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मानवत येथील रत्नापुर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात ४२ वे परभणी जिल्हा स्काऊट अँड गाईड मेळाव्यास जल्लोषात सुरुवात झाली. २८ ते ३१ जानेवारी या कालावधीमध्ये सुरू असलेल्या स्काऊट गाईड मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून शिक्षणाधिकारी (मा.) श्री. माधवराव सलगर तर उदघाट्क म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सचिन कवठे यांचे सह विशेष अतिथी म्हणून श्रीमती. अश्विनी स्वामी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी, श्री. प्रविणजी देशमुख अध्यक्ष लोणार शिक्षण प्रसारक मंडळ, प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गणेशजी शिंदे शिक्षणा धिकारी प्राथमिक जिल्हा परिषद परभणी, श्री. गजानन वाघमारे उप शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद परभणी, श्री. मुकेश राठोड गटशिक्षणाधिकारी पाथरी हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली त्यानंतर स्काऊट व गाईड पथक संचलन होऊन प्रमुख मान्यवरांना मानवंदना देण्यात आली या मध्ये श्री. विश्वनाथ बुधवंत, अनिल धुतमल यांनी मुख्य संचालन केले कार्यक्रमास उपस्थित अध्यक्ष व सर्व मान्यवरांचे स्कार्फ गॉगल पुस्तक व स्मृति चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी श्री. डी. आर रणमाळे यांनी केले प्रमुख पाहुण्यांच्या मार्ग दर्शनामध्ये श्री. गणेशजी शिंदे शिक्षणा धिकारी प्राथमिक जिल्हा परिषद परभणी यांनी आपल्या बालपणीच्या व स्काऊट गाईड मेळाव्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडचे महत्त्व विशद केले. श्रीमती. अश्विनी स्वामी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले तर श्री. सचिन कवठे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडचे महत्त्व सांगत जीवना मध्ये यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. किशोर तुपसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन मानवत सावरगाव केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. शिरिषजी लोहट यांनी केले. ***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704