सावळी येथे मराठा आरक्षण विजयी मिरवणूक
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथे मराठा आरक्षण विजयी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून आरक्षणा बाबत शासनाने २७ जानेवारी रोजी आध्यादेश काढला आहे या निर्णयाचा जल्लोष आणि स्वागत ठिक ठिकाणी करण्यात आले असून याच अनुषंगाने मानवत तालु क्यातील सावळी, सह सावरगाव खु. पाळोदी, आंबेगाव, या ठिकाणी या निर्णयाचा सर्वत्र जल्लोष करुन स्वागत करण्यात आले यावेळी सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने मराठा आरक्षण विजयी मिरवणूक काढण्यात आली विजयाचा गुलालाची उधळण करत अतिशबाजी करून हा आनंदो त्सव साजरा करण्यात आला तसेच गावागावातुन मुंबई येथील मराठा आरक्षण लढ्यात सहभागी झालेल्या योध्याचे औक्षण करुन त्याचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला व मराठा आरक्षण विजयी मिरवणुक काढण्यात आली यावेळी विजयी मिरवणुकीत सकल मराठा समाज बांधवांनी मोठया संख्येने उत्स्फूर्त पने सहभागी होत हा आनंदोत्सव साजरा केला.
**