आपला जिल्हा

माजी राज्यमंत्री स्व. बाबुरावजी मडावी यांची ९५ वी जयंती उत्साहात

गडचिरोली,प्रतिनिधी :-

आज दि. २७ नोव्हेंबर २०२२ ला आदिवासी परधान समाज मंडळ शाखा गडचिरोलीच्या वास्तूमध्ये आदिवासी समाजाचे  गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार, माजी राज्यमंत्री स्व. बाबुरावजी मडावी यांची ९५ वी जयंती समाज बांधवांच्या  उपस्थित उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सर्वप्रथम आदिवासी समाजाचे दैवत भगवान बिरसा मुंडा व समाजाचे प्रेरणास्थान, जिल्हयाचे शिल्पकार तथा माजी राज्यमंत्री स्व. बाबुरावजी मडावी यांच्या प्रतिमांना आदिवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, सचिव नरेंद्र शेडमाके, विजय उके साहेब, विनोद सुरपामजी यांच्या हस्ते पुष्हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

या प्रसंगी समाजातील व्यक्तींनी भगवान बिरसा मुंडा तसेच  जिल्ह्याचे शिल्पकार, लोकनेते, आदिवासी हृदयसम्राट स्व. बाबुरावजी मडावी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत संबोधित केले. त्यांचा संघर्षाची जीवनी समाज बांधवांना माहिती करून देण्यात आली.

या प्रसंगी महेंद्र मसराम, अजय सुरपाम, राज डोंगरे, विजय सुरपाम, आकाश कुळमेथे, ताजिसा कोडापे,विवेक वाकडे, अजय मसराम, रोहित अत्राम, निखिल वाकडे, नितीन शेडमाके,सुधिर मसराम, अनिकेत बांबोळे, साहिल शेडमाके, वैभव रामटेके, अंकुश बारसागडे, अजय सिडाम, अशोक नरोटे, महादेव कांबळे, सुरज गेडाम यांच्या सह वॉर्डातील इतर नागरीक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे संचालन युवा सदस्य रुपेश सलामे यांनी केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.