मानवत येथे विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन
बालकुमार साहित्य संमेलनाचे यंदाचे ६ वे वर्षे
मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरात दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ मंगळवार रोजी करण्यात आले असून या विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अनंत गोलाईत (गहिलोत ) यांच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक ०९ डिसेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते परंतु काही तांत्रिक कारणामूळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून दिनांक ६ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रा बरोबरच शैक्षणिक क्षेत्रात ही प्राचार्य अनंत धध गोलाईत यांचे नेहमीच मोठे योगदान असून या वर्षी ही बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे या बालकुमार साहित्य संमेलनाचे ६ वे वर्षे आहे. या बालकुमार साहित्य संमेलनास संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्री. विजयकुमारजी मिठे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून राज्य भरातून या संमेलनास प्रसिद्ध कवी, चित्रपट कलाकार, यांची उपस्थिती राहणार आहे. या वेळी संमेलनात उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते माजी संमेलनाध्यक्ष श्री. देविदास फुलारी, रमेश चिल्ले, इंद्रजीत भालेराव, संगीता ताई बर्वे, बाबासाहेब सौदागर, फ. मु. शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. तरी या बालकुमार साहित्य संमेलनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजक तथा स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अनंत गोलाईत (गहीलोत) यांनी केले आहे.
***