ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “विघ्नहर्ता”:लैलेशा भुरे

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला

*विघ्नहर्ता*
**************************
वंदन तुजला। वक्रतुंड देवा।
अर्पण तुज सेवा।श्री गणेश।।१।।

बुध्दीची देवता।दु:ख कर दूर।
मायेची फुंकर।आम्हावर।।२।।

देवा तू विघ्नहर्ता। दूर कर बाधा।
तुम्ही हित साधा।सगळ्यांचे।।३।।

पावन चरणी।सुखाचिया राशी।
सुख वैकुंठासी। लंबोदर।।४।।

करीतो आनंदे। तुझे गुणगान।
मना समाधान।लाभतसे।।५।।

नाव तुझे गोड।करीतो स्मरण।
चरणी अर्पण। भक्ती फुले।।६।।
**************************
लैलेशा भुरे
नागपुर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.