https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “मानव आणि निसर्ग. :लैलेशा भुरे

मानव आणि निसर्ग
**************************
नवीन वर्ष आले की सर्वांच्या आनंदाला उधाण येते.१जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस.अनेक लोक मनात संकल्प ठरवून असतात.जगभरातील लोक एखाद्या सणाप्रमाणे हा दिवस साजरा करतात.दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष सरत जातात.

 

 

 

प्रत्येक क्षणाक्षणाला बदल घडत असतो.गेलेले दिवस कधीच परत येत नाहीत.हे वास्तव स्वीकारून आपण प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक क्षणांचं सोनं करायचं असतं.मनात काहीतरी ध्येय ठेवून त्या ध्येयपूर्तीसाठी सतत प्रयत्नशील असायला हवे.बदल हा सृष्टीचा नियम आहे.त्यानुसार निसर्गचक्र सतत बदलत असतं.ह्या बदलांमुळे जुनी परिस्थिती बदलून नवीन परिस्थिती निर्माण होत असते.नवी संकटे,नवी आव्हाने नव्या समस्या अश्या अनेक गोष्टी बदलांमुळे घडत असतात.काही सकारात्मक बदल जीवसजीवांना संजीवनी बहाल करण्याचे,प्रेरणा देण्याचे काम करीत असतात.सकारात्मक बदल मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरतात,तर नकारात्मक बदल आव्हानात्मक ठरतात.
मानव हा सहजीवनप्रिय प्राणी आहे.अगदी पाषाणयुगापासून ते आताच्या यंत्रयुगापर्यंत सहजीवनाचा आस्वाद तो घेत आला आहे.सहजीवन जगताना त्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं आहे.अन्न,वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजापुर्तीसाठी प्रत्येकच जीव धडपडत असतो.ह्या गरजा जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.

 

 

 

 


मानवाला पशुपक्ष्यांच्या मानाने अधिक बुध्दी देवाने दिलेली आहे.त्यामुळे काळानुसार माणूस आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवून आणतो.माणूस आपल्या विवेकबुद्धीने जगत असतो.पूर्वीच्या काळी अन्न,वस्त्र, निवारा या माणसाच्या सिमित गरजा होत्या.पण हळूहळू कालचक्र बदलत गेलं आणि लोकसंख्या वाढत गेली.तसतशी मानवाची गरजांची व्याप्ती वाढत गेली.मानवाच्या आहारासंबंधी सवयी बदलल्या.जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तो शेतात नवनवीन अन्नधान्याची निर्मिती करू लागला.पिक लवकर यावे यासाठी सेंद्रिय पिक घेऊ लागला.याचा परिणाम असा झाला की माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली.त्याला नवनवीन रोग जडून मानवी आरोग्य धोक्यात येऊ लागले.यांत्रिकीकरणामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होत जाऊन बेरोजगारी भरमसाठ वाढली.परिणामी मानवाला महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत.यांत्रिकीकरणामुळे जरी मानवी जीवन प्रगतीपथावर असले तरी त्यामुळे जलप्रदूषण, वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण वाढले आहे ज्यामुळे निसर्गाचा -हास होतो आहे.
लोकसंख्या वाढीमुळे मानवासाठी निवारा ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरली आहे.वस्तीसाठी जागा अपुरी पडल्यामुळे त्याचे पाऊल निसर्गाकडे वळले आहे.निसर्गातील वनसंपदा,जलाशय,शेती इत्यादी ठिकाणी सिमेंट क्राॅंकीटच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.पर्यायाने येत्या पुढील काळात निसर्गातील ऑक्सिजन,पाणी यांचे प्रमाण कमी होऊन मानवी जीवन नष्ट होईल असा अंदाज जागतिक हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.निसर्गातील नकारात्मक बदल घडवण्यासाठी फक्त मानवच जवाबदार आहे.निसर्गाच्या -हासासाठी मानवी हव्यास हे एकमेव कारण आहे.मनुष्य स्वच्छंदी आणि मनमौजी बनल्यापासून त्याच्या आचार, विचारांना कसलीही सीमा उरली नाही.स्वार्थापोटी निसर्गाचा -हास करून अनिर्बंध वागू लागला.निसर्गचक्रात ढवळाढवळ करणे हे विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे.त्यामुळे आताच सावरायला हवे.निसर्गाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यायला हवं.
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704