https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

ग्राम विकास अधिकारी नसल्याने मानोलीकरांची कामे खोळंबली, ग्राम विकास अधिकार्‍यासाठी लक्ष्मण शिंदे यांचा आत्मदहनाचा प्रशासनाला ईशारा

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील मानोली ग्राम पंचायतीचे ग्राम सेवक नसल्याने मानोलीकरांची कामे खोळंबली असून
ग्राम सेवकांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी अन्यथा आत्मदहन करणार असा ईशारा एका निवेदनाद्बारे लक्ष्मराव शिंदे पाटील यांनी प्रशासनाला दिल्याने मानवत तालूक्यात प्रशासनाच्या कारभारामूळे खळबळ उडाली.

धो

सविस्तर वृत्त असे की, मानवत तालूक्यातील शिंदे ग्राम पंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या मानोली ग्राम पंचायती मध्ये गेल्या अनेक दिवसा पासून ग्राम सेवक नसल्याने ग्रामस्थांची कामे खोळबंली असल्याची तक्रार लक्ष्मण बाळासाहेब शिंदे मानोली ग्राम पंचायतीचे उपसरंपच सौ ज्योतीताई शिंदे यांचे पती असून त्यांना नेहमी नागरिकांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
गेल्या अनेक महिने झाले मानोली ग्राम पंचायती मध्ये ग्राम विकास अधिकारी नाही. त्यामुळे गांवातील जनतेच्या समस्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामूळे सामान्य जनतेची कामे खोळंबली आहे.
मानोलीतील सामान्य जनतेला त्यामूळे कोणतेच प्रमाणपत्र देखात येत नाही. त्यामूळे सर्व सामान्य जनतेची कामे रखडली आहेत. तर सामान्य जनता त्रस्त झाली असून सामान्य जनतेच्या रोषाला लोक प्रतिनिधी शिंदे यांना सामोरे जाण्याची पाळी आली आहे. जनतेने आम्हाला निवडून दिले त्याच्या समस्या प्रश्न सोडविल्यासाठी, पण ग्राम सेवक नसल्यामूळे आम्ही त्यांच्या कामांना न्याय देता येत नाही. उदा. नेमुना नं.-४ घरपटटी, जन्माच्या नोंदीचे प्रमाणपत्र कोणत्याचे नोंदीचे प्रमाणपत्र देता येत नाहीत. त्यामूळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे तात्काळ मानवत तहसिलचे तहसिलदार , आणि मानवत पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष बी. डी ओ साहेबांनी यांची नोंद घ्यावी अन्यथा दि. 30/12/2025 रोजी मानवतचे तहसिलदार यांच्या दालनात आत्मदहन करणार आहे. असा ईशारा लक्ष्मण शिंदे यांनी प्रशासनाला दिला. काही अनूचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी पूर्ण प्रशासनाची राहिले असा ईशारा निवेदनात लक्ष्मण शिंदे यांनी दिला आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704