https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षांचा माजी समाज कल्याणमंत्री बबनरावजी घोलप यांच्याहस्ते सत्कार.

मानवत / प्रतिनिधी.

राष्ट्रिय चर्मकार महा संघाच्या वतीने नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष यांचा बबनराव घोलप यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक.२८.१२.२०२३ रोजी राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री.माधवराव गायकवाड आणि नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष डॉ.शांताराम कारंडे यांचा माननीय श्री.बबनराव घोलप (नाना) राष्ट्रीय चर्मकार महासंघ (राष्ट्रीय अध्यक्ष) तथा माजी समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला, तर यावेळी नाशिक जिल्ह्यातील? राष्ट्रिय चर्मकार महासंघाच्या वतीने त्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
या वेळी महाराष्ट्र राज्याचे सचिव श्री. दत्तात्रय गोतिसे, नाशिक जिल्ह्या सचिव श्री.अनिल कानडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष श्री. निकितेश धाकराव, नाशिक शहर प्रमुख श्री.विष्णू लोहकरे , विभाग प्रमुख श्री.शरद पवार, काशिनाथ काशीदे, रवी गंगासागरे आदी सह अनेक मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704