https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवी आपल्या भेटीला “पहाटेचा गारवा”.लैलेशा भुरे

*विषय – पहाटेचा गारवा*
**************************
हाय हा पहाटेचा गारवा
थंड गुलाबी हवा
भास होतोय नवा
वेडावतो जीवा

जणू तार छेडले कुणी
कायेच्या कंपनातूनी
गीते साकारली नवी
हृदयाच्या गहराईतूनी

उष:काल होता होता
अरूणोदय झाला
पूर्व दिशेला केशराचा
सडा शिंपला

पक्षी चिवचिवाटाने
करती स्वागत पहाटेचे
सर्वत्र सुखद गारव्याने
चराचरात चैतन्य आले निसर्गाचे

उमलते पाकळी पाकळी
कळ्यांना जाग येते
तयाच्या श्वासातूनी
सुवासाची उधळण होते
**************************
लैलेशा भुरे
नागपुर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704