https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत तालूक्यातील सावळी येथे पशु वंध्यत्व निवारण शिबीर संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथे १२ डिसेंबर रोजी पशु वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पशुसंवर्धन विभागा अंतर्गत राजव्यापी पशु वंध्यत्व निवारण अभियान सर्वत्र सुरु असून या अभियाना अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिबिराचे उदघाट्न सावळी ग्राम पंचायतीचे उपसरपंच गोपाळ (आबा ) काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिबिरात गाय, म्हैस, शेळ्या, मेंढया अशा पशुंना गर्भधारणा होत नाही अशा पशुची व वंध्यत्व असलेल्या पशुची तपासणी केली गेली व त्यांच्या पुढील उपचार केले जाणार आहेत यावेळी पशु तपासणी साठी पाळोदी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – २ चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कापुरे, डॉ. वाहेद आन्सारी, डॉ. मोहन होंडे यांच्या उपस्थिती मध्ये तपासणी करण्यात आली शिबीर यशस्वी करण्यासाठी रघुनाथ काळे, युवा नेते अनिल काळे, निवृत्ती कांबळे, भारत काळे यांच्या सह पशु पालक यांनी प्रयत्न केले.

****

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704