https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अजित पवार यांनी पि.एचडी संशोधक विद्यार्थ्यांसंदर्भात बेजबाबदार व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा जाहिर निषेध.

आज दिनांक 13 डिसेंम्बर 2023 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा. विद्यापीठ नांदेड येथे,पिएडी संशोधक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात अजित पवार यांचा निषेध नोंदवला.

दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी विधानपरिषेदेत सतिश पाटिल यांनी सारथी संस्थेने संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याचा प्रश्न मांडला असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यानी उत्तर देताना ”पि.एचडी करून काय दिवे लावणार” असे बेजबाबदार व संशोधक विद्यार्थ्यांना लाजवणारे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे तमाम राज्यातील शैक्षणिक वर्तुळात कमालीची नाराजी पसरली आहे.संशोधक विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम मा.अजित पवार यांच्या वक्तव्याने झालेले आहे.
या आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मा.अजित पवार यांचे शिक्षण फक्त दहावी पर्यंत झालेले असून पी.एचडी च्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात वक्तव्य करण्याची त्यांची लायकी देखील नाही.


जगभरात विविध देशात शिक्षणावर अधिकधिक खर्च केला जातो तसेच विद्यापीठ अनुदान आयोग संशोधनाला मोठ्या प्रमाणात संशोधनाला चालना देत असून राष्ट्राच्या विकासात संशोधक विद्यार्थ्यानची महत्वाची भूमिका असून सामाजिक अन आर्थिक तसेच आंतरराष्ट्रीय संबंध तसेच वाणीज्य व विज्ञान मधील संशोधन हा देशाच्या विकासाचा एकमात्र मार्ग आहे हे अजित पवार यांना कळणारे नाही

धरणामध्ये पाणी नसेल तर ते पाणि कसे धरणात आणले जावे पाण्याचे व्यवस्थापन करून पाण्याचा तुटवडा भासणार नाही या संदर्भात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे परिश्रम मातीमोल करणाऱ्या मा. मंत्री महोदय जनाची नाही मनाची तरी बाळगणार का?
हा आता प्रश्न आता संशोधक विद्यार्थ्यांच्या मनात पडला आहे.

‘धरणात पाणी नाही तर मी काय मुतु का’.
असले विधान करणाऱ्या अडानचोट दहावी पास मंत्र्याला संशोधन काय कळणार?
अजित पवार यांनी विधान परिषदेत जाहीरपणे संशोधक विद्यार्थ्यांची माफी मागावी व आपले विधान मागे घ्यावे

अन्यथा राज्यभर विविध विद्यापीठात व विविध महाविद्यालयात संशोधक विद्यार्थी प्राध्यापक बेमुदत शैक्षणिक बंद पुकारतील.

निषेध नोंदवण्यासाठी विद्यार्थी नेते डॉ.हर्षवर्धन दवणे, हणमंत कंधारकर स्वप्नील नरबाग, डॉ.जयवर्धन गच्चे,डॉ.प्रवीण सावंत,सागर घोडके,किरण फुगारे, संविधान दुगाणे, सचिन पवळे, अक्षय पारदे,प्रकाश तारू, सचिन राजभोज,मनीष सिद्धेश्वरे,प्रवीण राठोड,जयवंत आठवले प्रशांत घोडवाडीकर,अमोल महीपाळे,नितीन गायकवाड.
मनीषा कांबळे,अपर्णा दुगाणे,मीना आडसे,दयानंद ढवळे नितेश हनवते,शिवराज वडजे.
इत्यादी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी उपस्तिथ होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704