https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयास जिल्हा व विभागीय युवा महोत्सवात दहा पारितोषिके प्राप्त.

नांदेड:

संयुक्त राष्ट्र संघद्वारा घोषित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा कृषी संचालनालय, महाराष्ट्र राज्य विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय लातूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 व 7 डिसेंबर 2023 रोजी जिल्हास्तरीय व दिनांक 8 व 9 डिसेंबर रोजी विभागस्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जिल्हा व विभाग स्तरावर नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले व महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय युवक महोत्सवात निवड झाली. महाविद्यालयाला जिल्हा व विभाग स्तरावर मिळालेली पारितोषिके पुढीलप्रमाणे; वैयक्तीक लोकनृत्य- प्रथम- आदिती केंद्रे, पोस्टर – प्रथम प्रतीक्षा हळदे, संकल्पना आधारित स्पर्धा या मध्ये पथनाट्य – प्रथम, ऍग्रो प्रॉडक्ट – तृतीय, लोकगीत – तृतीय व वक्तृत्व – तृतीय असे एकूण १० पारितोषिके प्राप्त झाली. या मधिल सहभागी कलावंत रूद्र शर्मा, अखिलेश पांचाळ, ओमजय पुयड, प्रभोध कवठेकर, अदिती केंद्रे, वैष्णवी सावरकर, प्रतीक्षा हळदे यांनी अथक परिश्रम घेउन हे यश संपादित केले. या महोत्सवात वैयक्तिक लोकनृत्य या कलाप्रकरत अदिती केंद्रे हिने सादर केलेल्या लावणी करीता महाराष्ट्रतील सुप्रसिद्ध ढोलकी वादक रविराज भद्रे, प्रसिद्ध हार्मोनियम वादक देवदत्त मेकाले व सुप्रसिद्ध गायिका पौर्णिमा कांबळे यांची साथ लाभली. या सहभागी विद्यार्थ्यांना डॉ. मनीष देशपांडे, डॉ. संदीप काळे, डॉ. आनंद आष्ठूरकर, प्रा. दत्ता बडूरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, सचिव ॲड. सौ. वनिता जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर, उप-प्राचार्य डॉ. कल्पना कदम, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वय डॉ. शशिकांत दरगु, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शालिनी वाकोडकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704