https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “तू नसल्यावर”: लैलेशा भुरे

एम सी आर न्यूज कवी आपल्या भेटीला "तू नसल्यावर"

*तू नसल्यावर*
**************************
नभी मनाच्या काळोख पसरतो
तू नसल्यावर
दाटते उरी भयान शांतता
तू नसल्यावर


टवटवीत बागही भासते भकास
तू नसल्यावर
पाने फुले उदास दिसती
तू नसल्यावर

चाचपडत असतो अंधारात मी
तू नसल्यावर
माझा मीच मला गवसत नाही
तू नसल्यावर

सूर्याचे तेजही मंद भासते
तू नसल्यावर
दाही दिशा उदास वाटतात
तू नसल्यावर

सा-या भावना निरर्थक ठरतात
तू नसल्यावर
एकाकी उदास वाटते
तू नसल्यावर

न संपती प्रहर दिवसाचे
तू नसल्यावर
डोळ्यातील स्वप्ने विरतात
तू नसल्यावर

अनेक प्रश्ने थैमान घालती
तू नसल्यावर
उत्तर मात्र सापडत नाही
तू नसल्यावर
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704