https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

इरळद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक सभेला शिक्षणाधिकारी आ. गणेशजी शिंदे यांनी केले अमूल्य मार्गदर्शन.

मानवत / प्रतिनिधी. परभणी शिक्षण विभागाला लाभलेले व्यक्तिपूर्ण खनखनीत खाणीतील कोहिनूर हिरा, शिंपल्यातील मोती,विद्यार्थी प्रिय, अनुभव संपन्न व्यक्तिमत्व, सच्चा माणूस, आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ,उच्चविद्याविभूषित, अखंड ऊर्जेचे प्रेरणा स्त्रोत असे अनेक बीरूदावली लावली तरी ती कमीच पडतील ते म्हणजे परभणी जिल्हाला लाभलेले शिक्षणाधिकारी मा.श्री.गणेशजी शिंदे, प्राथमिक (शिक्षण विभाग) जिल्हा परिषद परभणी, अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरळद येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिगांबर भिसे यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्वल भवितव्यासाठी शाळेच्या वतीने इरळद येथे पालक सभेसाठी आमंत्रित करण्यात आले. त्यासाठी मुख्याध्यापक दिगांबर भिसे यांनी शिक्षणाधिकारी आ. गणेशजी शिंदे यांच्याकडे वेळ मागितला आणि शिंदे साहेबांनी कोणत्या ही प्रकारचा विलंब न करता पालक सभेला आवर्जून उपस्थित राहण्याचे अभिवचन देऊन टाकले व या वेळी त्यांनी सांगितले की पालक सभा ही रात्रीला ठेवा त्यामुळे मला येता येईल आणि विद्यार्थी व पालकांशी संवाद साधता येईल अशा सूचना दिल्या होत्या. त्यामूळे दिनांक 04.ऑक्टोंबर 2023 वार बुधवार रोजी सायं 7.00 वाजता गावातील हनुमान मंदिर परिसर येथे गावातील सुजाण नागरिक, पालक वर्ग,माता भगिनी,व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. शिक्षणाधिकारी मा. गणेशजी शिंदे यांचे आगमन होताच गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने टाळ्यांच्या गजरात शिक्षणाधिकारी मा. गणेशजी शिंदे यांचे शब्दसुमनानी स्वागत केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री, ह.भ.प. महादेव महाराज इरळदकर , शिक्षणाधिकारी मा.श्री.गणेशजी शिंदे , उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री बजरंग गिल्डा, बाळासाहेब यादव यांच्या हस्ते राष्ट्रमाता , राजमाता,माॅसाहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलना नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री दिगांबर भिसे यांनी या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी शाळेच्या माध्यमातून चालत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती PPT च्या स्वरूपात प्रमुख पाहुणे व पालक वर्ग यांना दाखवण्यात आली. या वेळी बहारदार नृत्याचे सादरीकरण मराठवाडा गौरव गीत गाऊन सादर केले. *3)Mission English* speaking अंतर्गत अध्ययन निष्पत्ती नुसार विज्ञान विषयातील घटकाचे इंग्रजीमध्ये सादरीकरण करण्यात आले. विचार पीठावरील मान्यवर अध्यक्ष श्री, ह.भ.प. महादेव महाराज यांनी आपल्या मोजक्या शब्दात पालक सभेला मार्गदर्शन केले त्याच बरोबर प्रमुख अतिथी श्री, बजरंग गिल्डा सर यांनी आपल्या खुमासदार शैलीत विद्यार्थी व पालकांना त्यांच्या कर्तव्या विषयी जाणीव करून दिली. त्या नंतर शिक्षणाधिकारी मा.श्री.गणेशजी शिंदे यांनी पालक माता भगिनी व विद्यार्थी घडवताना पालक म्हणून असलेली *आपली कर्तव्य व जबाबदारी* त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाशी एकरूप कसे व्हावे या विषयीचे मार्गदर्शन केले, शिक्षक,विद्यार्थी व पालक हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा समभुज त्रिशंकू आहे यासाठी या तिन्ही शिरोबिंदूंनी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी आ. गणेशजी शिंदे यांनी या वेळी मार्गदर्शन करतांना आपले मनोदय व्यक्त केले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गा मध्ये माता-भगिनींचा सिंहाचा वाटा आहे तो ओळखून माय माऊल्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाकडे व शिस्तीकडे अधिक लक्ष द्यावे असे सांगितले,भविष्यवेधी शिक्षण प्रक्रियेतून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेता येतो स्वयंप्रेरणेने स्वयंशिस्तीने विद्यार्थी शिकत असतात विद्यार्थ्यांच्या या प्रवासात पालक वर्गाचा सिंहाचा वाटा असतो पालकांनायाची जाणीव असावी, विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक व भाषिक विकासासाठी शिक्षक कार्य करत आहेत त्यासाठी शिक्षणाधिकारी म्हणून मी सर्वतोपरी आपल्या सर्वांसोबत आहे असे आश्वासन शिंदे यांनी या वेळी दिले. विद्यार्थी व त्यांच्या शिक्षणा विषयीची असलेली तळमळ शिक्षणाधिकारी मा. गणेशजी शिंदे यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होती. “आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा,आज कष्ट करा व आयुष्यभर आराम करा.” *”लढाई से आपकी हिम्मत जानी जायेगी,* *और पढाई से आपकी किस्मत जानी जायेगी.”* अशा प्रकारे पालक सभेला साहेबांनी त्यांच्या विचाराने मंत्रमुग्ध करून खिळवून ठेवले. आपल्या पाल्याच्या गुणवत्तेसाठी व उज्वल भविष्यासाठी तळमळीने मार्गदर्शन करणारा असा आधिकारी पहिल्यांदाच अनुभवल्याचा आनंद गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या नंतर स्वयं प्रेरणेने इरळद ग्राम पंचायती चे सन्माननिय उपसरपंच श्री.अशोकजी कचरे यांनी विचार मंचाचे व शिक्षणाधिकारी आ. गणेशजी शिंदे यांचे आभार मानले व त्या नंतर शेवटी राष्ट्रगीताने पालक सभेची सांगता करण्यात आली. पालक सभा यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, संन्माननिय सदस्य , व शिक्षकांनी या वेळी परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704