ताज्या घडामोडी

सकारात्मक विचारांनी सर्व समस्या कायमच्या सुटतात. भास्कर मगर.

मानवत / प्रतिनिधी.

संकट किती ही मोठे असले तरी हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काही एक कारण नाही असे *हॅप्पीनेस प्रोग्राम मध्ये प्रशिक्षक भास्कर मगर यांनी सांगितले*. सद्या ईर्षा द्वेषभाव आणि वाढत्या अपेक्षांमुळे आपुलकी लोप पावत चालली आहे समाजातील वाढती स्पर्धा ही देखील तणावाचे एक निश्चित कारण मानले जाते मात्र संकट किती ही मोठे असले तरी हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्या वर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काही कारण नाही असे प्रतिपादन मानवत तालुक्यातील *आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक भास्कर मगर* यांनी *हॅपीनेस प्रोग्रॅाम* च्या समारोप प्रसंगी सांगितले.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहरातील के. के. एम. महाविद्यालयाच्या स्व.पन्नालालजी चांडक सभागृहांमध्ये ०४ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर या पाच दिवसाचे *हॅप्पीनेस प्रोग्राम* शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात पाच दिवसांमध्ये दैनंदिन जिवनातील ताण तणावातून मुक्तता मिळण्यासाठी आनंदाकडे वळा या आशयाखाली प्राणायाम, सुदर्शन क्रिया, आदिची सखोल माहिती देत जिवनातील दैनंदिन तान तणावातून बाहेर निघण्यासाठी मदत करण्यात आली.
तर दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी या शिबिर कार्यक्रमाचा समारोप झाला. समारोप प्रसंगी प्रशिक्षक भास्कर मगर यांनी बोलताना पुढे सांगितले की संकटांना घाबरून कोणाचे ही भले झाले नाही देशातील मोठ मोठाले उद्योगपती कर्ज बाजारी होतात. तेथे सामान्य आणि शेतकऱ्यांच्या अवस्थेची कल्पनाच न केलेली बरी तथापी निराशाचे कारण कोणते ही असले तरी कोणी ही आपला लाख मोलाचा जीव गमावू नये असा अमूल्य संदेश त्यांनी यावेळी दिला देशातीलच नव्हे तर विदेशात ही तणाव मुक्ती साठी आर्ट ऑफ लिविंग परिवार कार्य करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आनंदाकडे वळा म्हणजे हॅप्पीनेस प्रोग्राम या शिबिराचे आयोजन आर्ट ऑफ लिविंगच्या परिवाराच्या वतीने मानवत शहरात केले होते.
हे शिबिर दिनांक ०४ ऑक्टोबर , ०८ ऑक्टोबर या काळा मध्ये सकाळी ५:०० ते ८ : ३० या दरम्यान घेण्यात आले.
या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून भास्कर मगर, सूर्यप्रकाश तिवारी, सुनील बोरबने हे होते.
शिबिर यशस्वी संपन्न करण्यासाठी स्वयंसेवक दिपकजी शर्मा, मनीषजी उपलंचवार, पोलीस निरीक्षक दिपकजी दंतुलवार, मुख्याधिकारी श्रीमती. कोमलताई सावरे, राजूजी बुरलेवार व गोपाळजी टोपे यांनी परिश्रम घेतले.
शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून बसवेश्वरजी तोडकरी, दामोदरजी बांगड, गजाननजी कदम, पोलीस उपनिरीक्षक किशनजी पतंगे, प्रवीणजी लाहोटी, राहुलजी उदावंत, नगर पालिका कर्मचारी राजेशजी शर्मा, रामजी भुजबळ, सचिनजी इंगळे, राणा संजयजी नाईक, संजयजी लड्डा, संतोषजी अग्रवाल, विलासजी मोरे, आदितीताई गवते, वंदनाताई इंगोले, कोमलताई दगडू, निकिताताई झुटे, शितलताई गावंडे, ललिताताई दंतुलवार, लक्ष्मणजी दंतुलवार प्रतापजी दहे व प्रशांतजी दहे आदींची या वेळी उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.