https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथे श्री खंडोबा यात्रा महोत्सवास प्रारंभ

मानवत/प्रतिनिधी.

प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी येथील श्री खंडोबा मंदिरात श्री खंडोबा यात्रा महोत्सवास मंगळवार ९ जानेवारी पासून प्रारंभ झाला आहे.
या यात्रामहोत्सवा निमित्त दिनांक ९ जाने. रोजी सकाळी १० वाजता घटस्थापना करण्यात आली. वारू व आरतीचा कार्यक्रम रोज रात्री ८ ते ९ या वेळेत होत आहे. मंगळवार दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी श्री भगवान खंडेराया ( खंडोबा ) यांचा शुभविवाह सकाळी सुर्योदय समयी ६.५५ वाजता होणार आहे. या विवाहाचे यजमानपद मानवत येथील प्रतिष्ठित जाधव परिवारातील सौ व श्री अनुराधा अनिल जाधव हे भूषविणार आहेत. तर यात्रेची सांगता बुधवार दिनांक १७ जानेवारी रोजी श्री. ह.भ.प. विनोदाचार्य शिवा महाराज बावस्कार यांचा किर्तनाचा कार्यक्रम १० ते १२ वाजता आयोजीत केला असुन या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
सायं. ४ ते रात्री १० वाजेपर्यंत श्रींची भव्य पालखी मिरवणुक निघणार आहे. भक्तांनी या महोत्सवातील कार्यक्रमास तसेच पालखी सोहळ्यास भंडारा व खोबरे घेऊन उपस्थित रहावे व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ असे आवाहन श्री खंडोबा यात्रा पंच कमेटी व श्री खंडोबा मित्र मंडळ, मानवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

॰॰

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704