https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

विद्यासागर हायस्कूल मध्ये राजमाता, राष्ट्रमाता, माँसाहेब, जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. करंजी येथील विद्यासागर हायस्कूल मध्ये दिनांक १२ जानेवारी रोजी राजमाता, राष्ट्रमाता , माँ साहेब जिजाऊ, व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री के. कल्याण वसेकर हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून रूढी आश्रम येथील आचार्य १००८ महामंडलेश्वर श्री. मनिषानंद चैतन्य शास्त्री महाराजांचे शिष्य व विद्यासागर हायस्कूलचे माजी विद्यार्थी तसेच संस्कृत मध्ये चार सुवर्ण पदक मिळविणारे श्री. राघव चैतन्य शास्त्री आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरबा येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सह शिक्षक, अमोघ वक्तृत्वाचे धनी, श्री. हनुमान भगवानराव रणेर तसेच खरबा येथील हर हुन्नरी कार्यकर्ते व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री हरिभाऊ निर्मळ हे होते. प्रतिमा पूजन आणि सत्कार समारंभा नंतर राघव चैतन्य शास्त्री यांनी आपल्या भाषणातून स्वामी विवेकानंद यांच्या अध्यात्मिक जीवनाचा व कार्य कर्तृत्वाचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.
त्यांनी आपल्या भाषेत भाषणातून विद्यार्थ्यांना ध्येयासक्त होण्याची व ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी कोणतेही आवाहन पेलण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर हनुमान रणेर सरांनी आपल्या अमुक वक्तृत्वातून राष्ट्रमाता,राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची त्यांनी केलेला त्याग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या संस्कारांची मूर्तिमंत प्रतिमा विद्यार्थ्यां समोर उभी केली. त्यांनी नीतीमत्तेच्या, माॅसाहेब जिजाऊ साहेबांनी दिलेल्या शिकवणीच्या व छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा आदर्श घेऊन आकाशात उंच झेप घेण्याची विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करावे, एकदा गेलेली संधी पुन्हा मिळत नाही, तिचा वेळीच फायदा घ्यावा अशी शिकवण त्यांनी आपल्या भाषणातून दिली. त्यानंतर शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जिवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले. यात वर्ग पाचवीतून राधिका हरकळ, ज्ञानेश्वरी जाधव,स्मिता चिखले, शारदा जाधव, अनुष्का जाधव, अयोध्या निर्मळ, धनराज पितळे, स्नेहा उगले, गोविंद थोरवट, जानवी साळवे, राधिका जाधव इयत्ता सहावीतून गायत्री नरवडे, श्रुतिका जाधव,परमेश्वर डोने,मुंजा पितळे, समर्थ जाधव इयत्ता सातवीतून अक्षरा जाधव, श्रेया जाधव,पूनम कांबळे, स्वरूपाली निर्मळ, ऋतुजा पोंडे, वैदही निर्मळ, अश्विनी कुऱ्हे, इयत्ता आठवीतून साधना जाधव, उर्मिला निर्मळ,रोशनी निर्मळ, अक्षरा निर्मळ, इयत्ता नववीतून आरती डंबाळे,राजर्षी हिंगे, माऊली जाधव,आदित्य जाधव, अंजना जाधव, तर इयत्ता दहावीतून स्नेहा निर्मळ आणि शीला ढगे या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाषणे, कविता, चारोळ्या आणि गौरव गीता तून स्वामी विवेकानंद व जिजाऊ माँ साहेबांची थोरवी वर्णन केली. इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी गायत्री विष्णू जाधव व इयत्ता दहावीतील मुक्ता ज्ञानोबा जाधव चारोळ्या,शेर शायरी व विनोदाच्या माध्यमातून खुमासदार सूत्रसंचालन करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यासागर हायस्कूल मधील अनेक विद्यार्थ्यांनी माँसाहेब जिजाऊ यांच्या वेशभूषेत आल्या होत्या त्यामुळे शालेय परिसर अगदी जिजाऊ मय झाला होता. अतिशय रमणीय वातावरणात कार्यक्रम पार पडला. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री ज्ञानोबा इंगळे यांनी प्रमुख वक्ते व उपस्थितांचे आभार मानले व ‘जिजाऊ वंदना’ गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. रमेश वरकड, श्री. मधुकर शिंदे, श्री. आनंद आसोलेकर, श्री. लक्ष्मण वाघमारे, श्री. ज्ञानोबा मुरमुरे, श्री. रेणुकादास मुळे यांनी सहकार्य केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704