आरोग्य व शिक्षण

महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघाच्या कार्यकारणीवर संदीप एडके, जालिंदर गायकवाड, बंडू कांबळे, प्रदीप बिडला यांची नियुक्ती

प्रतिनिधी नांदेड महाराष्ट्र राज्यातील अकृषीत विद्यापीठांमध्ये मागासवर्गीय संघटना कार्य करतात याच अनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीच्या वतीने आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील संघटनेवर संदीप एडके, जालिंदर गायकवाड ,बंडू कांबळे , प्रदीप बिडला यांची महासंघाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे. या निवडीच्या वेळी महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष काळबाजी हानवते , शेख सिकंदर, शामराव हंबर्डे नारायण गोटे ज्ञानेश्वर पवार संभा कांबळे, अनिल सोनकांबळे दिलीप चित्ते, मोहन हंबर्डे , बळीराम चित्ते, सलीम खान पठाण ,शेख रशीद शशिकांत लोहबंदे, प्रा. दत्ता हळदे, सचिन पवळे, शंकर शिंगार पुतळे, कोळशीवार ,आनंद लुटे, प्रा. जगदीश जोगदंड आणि प्रा डॉ. नितीन गायकवाड यांची उपस्थिती होती

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.